समिष्टीसाठी काहीही
समिष्टिसाठी काहीही
मला वडिलांकडून मिळालेला एक सल्ला म्हणजे, वाद भांडण जेवढे टाळता येतील तेवढे टाळावे. जरी परिस्थिती विपरीत असेल तरी मध्य मार्ग काढायचा प्रयत्न करावा. मी ही त्याच तत्त्वावर चालत असतो. अनेक वेळा समिष्टी करायचा प्रयत्न करत असतो. भले थोडा तोटा झाला तरी चालेल परंतू नाती तुटता कामा नये. पण कधी कधी ही माघार आपली कमजोरी समजली जाते, विनंती करून करून आपण थकून जातो पण आपल्याला दाद दिली जात नाही. अनेक मीटिंग करून आपण मध्य मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो त्यातून समोरच्याला ते पटत पण जेव्हा तिसरा व्यक्ती सोबत ते चर्चिले जाते तेव्हा ते निर्णय परत फिस्कटले जातात. आणि समोरचा शब्द पाळत नाही, आपण कितीही मीटिंग लावायचा प्रयत्न केला तरी आपल्याला दाद तर सोडाच पण गृहीत ही धरले जात नाही.
मग काही गोष्टीत आपली ताकत आणि नियोजन दाखवावे लागते. हे करून विजय प्राप्त झाला की मग सुरू होते ती आपली बदनामी. बरं जवळचे बदनामी करून विसरून जातात आणि परत जवळ ही येतात. मात्र काही समाज कंटक या तथाकथित बदनामीचा फायदा स्वतःसाठी करून घ्यायचा प्रयत्न करतात. समोरच्याला कमी लेखण्यासाठी खरी बाजू समजून न घेता फक्त चुकीची बदनामी समाजात पसरवत राहतात.
अशा लोकांना दुर्लक्षित करणे हेच आपण करू शकतो.
कारण अफवावर विश्वास ठेवून स्वतचं मत बनवणारे फार काळ यशस्वी होत नसतात. जे भूतकाळात रमत भसतात ते भविष्य घडवू शकत नाहीत.
आपण आपलं नात जपत, आपली आचार विचार अमलात आणत पुढे चालत राहणे योग्य असते..आणि समिष्टिसाठी प्रयत्न करत राहायचे असतात.
Comments
Post a Comment