आपल्यानंतर पुढे काय?

*आपल्यानंतर  पुढे काय?*
आपलं बाळ दिव्यांग झालं की प्रतेक आई वडिलांना अगणित प्रश्नांची उत्तर शोधावी लागतात. बाळ स्वतंत्रपणे चालेल.का? बोलेल का? त्याच्या गरजा ते कस सांगेल? सुसू, शी..ला झाले तर कस सांगेल? स्वतः जेवेल का? जसा कर्णकर्कश भोंगा सतत कानात घोंगवतो तसा एक विचार  डोक्यात  सतत घोंगावत असतो तो म्हणजे,  आपल्या नंतर कोण आधार देईल? कोण याची काळजी घेईल? दिव्यांग पालकांना हा प्रश्न सतावतो तर विचार करा ज्या बाळाचे आई वडील त्या दिव्यांग जीवाला असेच वाऱ्यावर सोडून गेलेत आणि त्याची जबाबदारी आईंचे आईवडील म्हणजे आजी आजोबा घेत आहेत, त्यात ते आता थकले आहेत, त्यात दिव्यांग बाळ सेरेबाल पालसी असलेली मुलगी.. 13 वर्षाची मुलगी.. असेल तर त्यांना काय वाटत असेल?. ही गोष्ट आहे त्या जान्हवी कारंडे ची आणि डोंगरा एवढा आधार झालेल्या तिच्या आजी आजोबांची. 
जन्मताच सेरेबल पल्सी झालेली जानवी कसा तरी जगायचं प्रयत्न करत होती. कुठेतरी तग धरत होती. पण तिच्या नशिबात तिच्या आईवडिलांचा आधार नव्हता.  तिच्या आई वडिलांना हा धक्का सहन झाला नाही आणि जानवी ला तिच्या हालता मध्ये सोडून गेले. देवाघरी गेले नाहीत पण देवाने दिलेलं लेकरू सोडून भित्र्यासारख स्वतचं आयुष्य जगायला गेलेत. आपल्या दिव्यांग मुलीच काय होईल? कोण करेल तीच? ती जगेल का?  असे प्रश्न नसतील पडले त्यांना?
पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी.. असच जानवी च्या बाबतीत घडलं. तिच्या आईचे,आई-वडील. म्हणजे तिचे आजी आजोबा नी तिला सांभाळले. हिराबाई व देवदास वाघमारे  हे दापंत  जीवापाड कष्ट करत आहेत. दोघे स्वतः थकले आहेत तरी जिद्द न हारता आपल्या नातीचे जीवन फुलवत आहेत. ती पूर्ण पणे एका जागेवर असते, पाण्याला घाबरते, एकटी असली की रडते, सू..शी.. च सांगू शकत नाही. उत्पन्नाचं साधन नाही. अशात त्यांना आधार भेटला तो सहयोगणी संस्थेचा. राशन देण्यापासून ते तिला दिवसभर सांभाळणे, तिचे थेरपी घेऊन तिला शांत करणे, आजी आजोबांना आधार देणे हे सर्व करत करत भविष्यात जानवी व तिच्या सारख्या अनेक बालकांना  कायमस्वरुपी आधार मिळावा यासाठी सहयोगीनी संस्था प्रयत्न करत आहे. या जीवांचे जीवन त्यांच्या आई-वडील, आजी-आजोबा पश्चात देखील चालावे हे मिशन घेऊन संस्था काम करत आहे.  
आपल्या नंतर काय?  या प्रश्नाचे उत्तर सहयोगी नी संस्था आहे आणि ते नक्कीच यशस्वी होतील यात शंका नाही. 
धन्यवाद..
जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)