एक विचार आणि योग्य एकता
*एक विचार आणि योग्य एकता*
कालच्या निकालाने स्पष्ट केले की जे फक्त स्वतसाठी जगतात आणि स्वार्थाने बरबटलेले असतात ते कोणाचेही नसतात. स्वाभिमान, आत्मसन्मान, देशाभिमान, देशसेवा अशा गोष्टी हे लोक पायदळी तुडवतात.. अशासाठी पक्ष, समूह हा फक्त स्वतच्या फायद्यासाठी असतो. ज्यांनी भूतकाळात यांना अपमानित केलेलं असते अशांच्या मांडीला मांडी हे लाऊन बसतात. आणि समहू कडून स्वतच्या अपमानाचा बदला घेतला जावा अशी अपेक्षा करतात. असे डब्बल ढोलकी विचारधारा ही विरोधी विचारधारे पेक्षा घातक असते. याचाच परिणाम कालच्या निकालावर दिसत आहे.
अशी विचारधारा देश, राज्य, जिल्हा, तालुका आणि अगदी गाव पातळीवर सुद्धा असते..
एखाद्या समहुने कितीही एकीचे प्रयत्न केले तरी अशी विचारधारा अगोदर बाद करणे आवश्यक असते. त्यासाठी ठराविक पण योग्य विचारधारा एक होणे गरजेचे आहे आणि लेचीपेची स्वार्थी वृत्ती वाले त्यांच्या वृतीनुसार त्या पायरीवर ठेवणे गरजेचे असते.
शेवटी एक विचार आणि योग्य एकता यातच ताकत आहे.
धन्यवाद..
Comments
Post a Comment