कधी कधी स्वतचं स्वताची पाठ थोपटून घेत राहायचं असत...
आजकाल अनेक शालेय कॉलेज विध्यार्थी अपयश आले की टोकाचा विचार करतात आणि आत्महत्येचा विचार करतात किंवा घरदार सोडून जातात अशा विद्यार्थ्यांना उभारी देणारी कविता सुचली.. ती इथे मांडतोय..
नक्की दाद द्या..
कधी कधी स्वतचं स्वताची पाठ थोपटून घेत राहायचं असत...
स्वतचं स्वतचं मन ओळखयाच असत..
उन्हात चालता चालता स्वतचं स्वतच्या सावलीत उभ राहायचं असत..
अंतिम ध्येय हे जगत राहणं असत.. म्हणून चालायचं थांबायचं नसतं..
कधी चढ कधी उतार.. कधी यश कधी अपयश चाखायच असत.. तेव्हा कुठं जीवन मधुर होत असत..
हरलो म्हणून थांबायचं नसतं.. मावळतीचा सूर्य पुन्हा लख्ख प्रकाश घेऊन उगवत असतो त्याला साक्ष ठेऊन आपण ही चमकायच असत..
जाणार तर इथून प्रत्येकजण आहे.. त्या वेळेत आपला ठसा उमटवत राहायचं असतं..
कधी कधी स्वतचं स्वताची पाठ थोपटून घेत राहायचं असत...
कवी
जयंत जगताप..
Comments
Post a Comment