श्री गणेश मित्र मंडळ - एक सामाजिक ओढ असलेलं आणि कर्तृत्ववान मंडळ

*💐💐💥🐅🐅श्री गणेश मित्र मंडळ - एक सामाजिक ओढ असलेलं आणि कर्तृत्ववान मंडळ💐,😎💥
लॉक डाउन चा उपयोग गावच्या विकासात आणि सामाजिक कार्यात अतिशय योग्य पद्धतीने करून श्री गणेश मित्र मंडळाने एक नवीन आयाम घालून दिला आहे. 
उन्हळयात, गावच्या पिण्याच्या पाण्याच्या जुनी पाईप लाईन होती काढून आणली आणि गावचे एक मोठे काम मंडळाने फक्त 2 दिवसात पूर्ण केले. 
पाऊस चालू झाला, पेरणी झाली, शेतीची इतर कामे संपलीत आणि आषाढी जवळ आली. 
तसे *श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री भरत श्रीपती गोळे*  यांच्या डोक्यात एक संकल्पना आली की, काळ भैरवनाथ मंदिर जे गावचे एक पुरातन मंदिर आहे आहे आणि गावची शान आहे त्याचे डागडुजी आणि रंग काम केले तर मंदिर अजून मजबूत *विशेष सहकार्य लाभले ते  
विठ्ठल नामदेव गोळे, (बाबा) अमोल सर्जेराव गोळे, रोहिदास बबन गोळे, संपत सखाराम गोळे, सुनील सखाराम गोळे, गणेश लक्षुमन गोळे, आत्माराम राजाराम गोळे, कृष्णात विठ्ठल गोळे, अविनाश विलास खुडे, वैष्णव प्रकाश पंडित, सुधीर मारुती गोळे, प्रमोद मनोहर गोळे, आणि मंडळाचे सर्व जिगरबाज कार्यकर्ते.*
 श्री विठ्ठल गोळे(अण्णा) माजी सरपंच यांचे मार्गदर्शन मिळतच होते, ते घेऊन, मंडळाचे कार्यकर्ते कामाला लागले, विशेष पुढाकार घेतला तो संतोष जगताप आणि अमोल (गुरू) यांनी. सोबत सर्व कार्यकर्ते जोमाने काम करतच आहेत. अध्यक्ष चा शब्द कधीच खाली पडू न देणारे कार्यकर्ते लाभल्याने मंदिर डागडुजी आणि रंगकाम कमी वेळात, फक्त कार्यकर्त्याच्या आर्थिक सहकार्यातून अतिशय जोमात आणि ऊतसहात अगदी कमी वेळात चालू आहे. 
गावातील रंगकाम करणारे सर्व कार्यकर्ते कोणतेही मानधन न घेता कठोर अशी मेहनत घेऊन मंदिराचा कायापालट करत आहेत. अगदी बारीक बारीक गोष्ट, प्रत्येक जण स्वतःची समजून काम करत आहेत. 
गावाचा विकास होतो तो अशा जबरदस्त आशा कार्यकर्त असल्या मुळेच. 
अभिमान आहे या मंडळाचा सभासद असल्याचा.

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)