ग्राम प्रशासक नेमणूक

महोदय,
        सध्या भारतात वाढत असलेल्या कोरोना संकटामुळे, राज्यसरकारने आपल्या राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका प्रक्रिया स्थगित केल्या आहेत.  तोपर्यंत गावचा विकास साधण्यासाठी आणि प्रशासकीय काम पाहण्यासाठी आपल्या सहमतीने प्रशासक नेमायचा आहे. 
  महू गावात सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपणास विनंती करतो की, प्रशासक या पदासाठी श्री. विठ्ठल दगडू गोळे याना नियुक्त करावे. श्री विठ्ठल गोळे याना सरपंच या पदाचा 15 वर्षाचा अनुभव आहे. त्यांच्या कार्यकाळात गावाचा सर्वांगीण विकास झाला आहे. त्यांना स्वच्छ ग्राम अभियान आणि घरोघरी सौचलाय बांधण्याच्या कामात केलेल्या अतुलनीय कामगिरी साठी तत्कालीन दिवणंगत राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
सध्याच्या अवघड काळात देखील त्यांनी गावाला सहकार्य करून संचारबंदी यशस्वी केली आहे. गावातील तंटे, आपापसातील वाद मिटवण्यासाठी विठ्ठल गोळे यांच्या शब्दाला प्रमाण मानले जाते. तसेच गावात स्थानिक सरपंच निवड सर्व सहमतीने बिनविरोध करून गावातील गटबाजी नाहीशी केली आहे. आपण देखील वरील सर्व गोष्टी जाणून आहातच.आशा अनुभवी आणि हुशार माजी सरपंचास प्रशासक म्हणून नेमावी अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आपणास विनंती आहे.

आपले नम्र
ग्रामस्थ मंडळ महू
   

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)