धाकटा भाऊ
+++++++++ *धाकटा* +++++++
इंटरनेट वर धाकट्या भावा विषयी काही लिहल आहे का त्याबद्दल शोधत होतो पण विशेष अस काही सापडलं नाही. थोरल्या भावा बद्दल अनेक लेख, कविता सापडल्या, त्याच्या त्याग, परिश्रम, वेळप्रसंगी थोरला वडिलांची जबाबदारी सांभाळतो. पण थोरल्याला थोरलेपण यायला धाकटा असावा लागतो.
धाकटा जन्मताच थोरल्याच्या छत्रछायेखाली मोठा होत असतो, मोठा करेल ते बघत बघत तो ही तेच शिकत असतो. त्याला आधार असतो म्हणून तो बिनधास्त असतो, कमी जबाबदारी असते म्हणून थोडी जास्त मौजमजा करत असतो. समाज ही त्याला तसंच गृहीत धरत असतो. नातेवाईक, घरात, समाजात थोरल्याच नाव वाढत जात असते, माझ्या मोठ्या भावाचा सन्मान म्हणजेच माझा सन्मान अस धाकट्याला लहानापासून मनावर बिंबवून घ्याव लागत असत.
मला वाटत मोठ झालं की समाजात स्वतःच नाव करायला धाकट्याला जास्त परिश्रम करावे लागतात. एकतर जसं वडाच्या एका झाडाखाली दुसरा वड उगवत नाही त्याप्रकारे त्याला त्याच्या मोठ्या भावाच्या छत्रछायेतून बाहेर यावे लागत किंवा मोठ्याच कर्तृत्व पेक्षा जास्त कर्तृत्ववान व्हावं लागत. कधी कधी थोरला जाणूनबुजून धाकट्याला दूर करतो जेणेकरून तो स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावर उभा राहील.
हे झालं समाजात, पण घरात, जर घर एक मोबाईल आहे अस समजले, तर मोठा त्या मोबाईलची बॅटरी असतो आणि दाखला बॅटरी बँक अप असतो. वेळ प्रसंगी हा बँक अप खूप कामाला येतो. धाकटा असतो म्हणून थोरला अनेक धाडसी निर्णय घेऊ शकतो. धाकट्याला सपोर्ट सिस्टीम म्हणून बघितले जाते.
म्हणून जेवढा थोरला महत्त्वाचा तेवढाच धाकटा सुद्धा.
लेखक जयंत जगताप
*असाच आमचा धाकटा बंधू विजय जगताप याचा आज जन्मदिवस. त्या निमित्त थोरल्या बंधू कडून लाख लाख शुभेच्छा.*
Comments
Post a Comment