आमच्या शाळेतील शिक्षिका

                      
.          *दुग्धशर्करा योग*
शाळा आणि तेथील आठवणी या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय असतो. आपला वैचारिक, शैषणिक पाया तिथेच तयार होत असतो. शाळा सोडून अनेक वर्षानंतर प्रत्येकाला उत्सुकता असते ती पुन्हा एकदा आपल्या शाळेतील शिक्षकांना भेटायची. 
आम्ही 2000 च्या बॅच चे R. F. Naik शाळेचे विद्यार्थी. 2021 ला आम्ही कोरोनाची पहिली लाट ओसरली तेव्हा खडबडून जागे झालो आणि ठरवले पुन्हा एकदा आपण शाळेतील विद्यार्थी भेटायचे. कोरोनाची दुसरी लाट दस्तक देत होती तरी देखील अगदी नेटाने सर्वांनी मेहनत केली आणि स्नेहसंमेलन यशस्वी केले. अनेक शिक्षक आले पण 3 महत्वाच्या शिक्षिका येऊ शकल्या नव्हत्या. 
*चौथीच्या वर्ग शिक्षिका पूजा पाटील टीचर, दहावीला ज्यांनी आमचा मराठीचा पाया नुसता पक्का केला नाही तर त्याचे बुरुज कधीही ढासळणार नाही इतका मजबूत केला आणि शाळेच्या उपमुख्यद्यापिका साठे टीचर, आणि त्यावेळेस शाळेच्या असलेल्या मुख्याध्यापिका आणि आम्हाला इतिहास शिकवणाऱ्या दांडेकर मॅडम.*
आज 2025 मध्ये योगायोगाने कोपरखैरणे मध्ये गणेश वडापाव येथून वडापाव खाऊन खाली उतरलो आणि समोरून दांडेकर मॅडम, साठे मॅडम आणि आमच्या पाचवी ते सातवी च्या क्लास टीचर थळे टीचर  चालत येताना दिसल्या. मी गाडीवर बसलो होतो, सोबत माझा मुलगा पण होता, त्याला गाडीवर बसून निघायची घाई होती तरीपण त्याला कस तरी मनवले आणि मी त्या तिघीना भेटलो. 25 वर्षानंतर साठे आणि दांडेकर मॅडमला बघून आनंद झाला. तिन दिग्गज टीचर सोबत गप्पा मारून सेल्फी घेताना एक वेगळाच आनंद झाला. माझ्यासाठी हा दुग्धशर्करा योगच होता. 
जयंत जगताप
सन 1993 ते 2000.  Rf naik स्कूल विद्यार्थी. 

  

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)