संघटन

                *संघटन/मंडळ*
संघटन म्हणजे एका विचाराने एकत्र आलेला समहू. मग तो कसाही छोटा-मोठा कसाही असू शकतो. कोणतही संघटन तयार होत ते कोणत्या ना कोणत्या उद्देशासाठी. एकदा उद्धिष्ट ठरले की  ते रुजने, वाढणे, टिकणे, विस्तारने हे अवलंबून असते चार विचारांवर *१.विश्वास 2. आदर 3.प्रामाणिकपणा आणि 4. शिस्त.*  
*विश्वास*- संघटन मध्ये सर्वच नेतृत्व करू शकतील अस नसत. स्वयंस्फूर्तीने  काही जण संघटन चालवतात त्यांना बळ देणं, त्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडणे, त्यांना जे दूर दृष्टीने दिसत असते ते यशस्वी करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न गरजेचे असतात. अशावेळी त्या नेतृत्वावर विश्वास हेच सर्वश्रेष्ठ सहकार्य असत.  
*आदर*: एकदा विश्वास बसला की एकमेकांना आदर देऊन कार्य पुढे घेऊन जाणे गरजेच असत. आदराने कार्य आनंदात पुढे जाते.  विनाकारण होणारे वाद हे आदरभावनेने टाळले जातात. 
*प्रामाणिकपणा*: आपल्यावर ठेवलेला विश्वास हा आपल्या प्रामाणिकपणाच फळ असते. तो टिकवणे आपल्या हातात असते. प्रमाणिकपणा नसेल तर संपूर्ण संघटन तुटू शकते आणि उद्धिष्ट कधीच साध्य होऊ शकत नाही.
आणि 
*शिस्त*: कितीही बलाढ्य आणि मोठे संघटन असले तरी शिस्त नसेल त्याचे आयुष्य कमी असते. जेव्हा खूप मोठा पल्ला गाठायचा असतो तेव्हा शिस्त ही अनिवार्य असते. 

धन्यवाद 
जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)