उबाळ पुराण
हॉस्टेलच्या आठवणी
उबाळ पुराण
शरीरात गर्मी वाढली की शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या फोड्या येतात आणि त्यातून गर्मी बाहेर पडते. त्या फोड्या कुठेही येऊ शकतात, डोक्यात केसात, चेहऱ्यावर, हातावर, मांडीवर, काखेत आणि इतर नाजूक जागी. छोट्या फोड्यापेक्षा या फोडी मोठ्या असतात. यांना उबाळ म्हणतात. या आधी कडक असतात मग हळूहळू मोठ्या होतात, त्यात पू तयार होतो तो दाबून बाहेर काढावा लागतो तेव्हा कुठे त्या बऱ्या होतात. कधी कधी त्या उग्र सुद्धा होतात त्यात रुग्णाला ताप येणे, कणकण जाणवते.
चला उबळ म्हणजे काय ते समजले असेलच आता वळू उबळ कथेकडे.
इंजिनियरिंग कॉलेजला असताना आम्ही हॉस्टेल मधे राहायला होतो. 2005-06 ला थर्ड इयरला बापू(दत्ता खंडागळे) माणक्या (माणिक बॉम्बे) आणि मी जग्गू (कॉलेज चे नाव) असे तिघे पार्टनर होतो. आमचा मित्र संतोष खांदवे दुसऱ्या रूम मध्ये होता त्याचा पार्टनर आबा (अमित माने) उंचीने छोटा, गुटगुटीत शरीरयष्टी, आणि मनाने खूप मोठा माणूस. संताच्या रूम मधे आम्ही कधीही जायचो. आमच्या रूमला तर लॉक च नव्हतं त्यांचा रूम च लॉक फटका मारलं की निघायचे हे आम्हाला माहित होते.
दिवाळी सुट्टीवरून सर्वजण परत येत असत तेव्हा सर्वजण घरून खूप फराळ घेऊन येत असत. आमचा एक entc च 8 -10 जणांचा वेगळा ग्रुप होता त्यात आम्ही अस करायचो की सर्व फराळ एकाच्या रूम वर एक टेबलवर ठेवला जाई. मग ज्याला जेव्हा इच्छा होईल तेव्हा तो कोणताही फराळ खात असे. हॉस्टेल मधे आलेली खायची गोष्ट कधीच व्ययक्तिक राहत नसे.
आबा cs ला होता. त्यामुळे त्याचा फराळ आमच्यात नसे.
असेच एक दिवस दुपारचे जेवण करून आम्ही, बापू आणि मी, आबा च्या रूमचा लॉक फटक्याने खोलून रुम मधे गेलो. दोघे एक एक बेड वर निवांत पडलो असताना काहीतरी गोड गोष्टीचा वास येत होता. आबाच कपाट उघडलं तर त्यात मोतीचूरचे लाडू चा मोठा डब्बा होता.
लाडू घरी बनवलेले होते. एकयाएक खाल्ला तर खूप आवडला. मग अजून एकेक खाऊन आम्ही मस्त पैकी कॉलेजला निघून गेलो. मग पुढचे आठ दिवस बापू आणि माझा रोजचा दिनक्रम झाला. आठ दिवसात सगळे लाडू आम्ही संपवले आणि ते पण आबाला न विचारता किंवा सांगता. (नंतर आम्ही उबाळच्या जाळ्यात अडकलो तेव्हा आम्हाला आबा कडून आम्हाला ते समजले की त्याला माहीत होते आणि आम्ही खातोय म्हणून तो स्वतः खात नव्हता. हे त्याचे मोठेपण).
लाडू संपवून 8 दिवस झाले असतील आणि एक दिवस बापूला उजव्या काखेत दुखू लागले. त्याने नीट तपासले तर त्याला काखेत उबाळ आलं होत. दोन दिवस बापू la कणकण आली. रूम वर पडून राहिला. तिसऱ्यादिवशी दुपारचं कॉलेज वरून मी आलो तर बापू कण्हत होता. मग मी डेअरिंग करून म्हटले थांब poo काढतो. Mag हळू हळू दाबून ते उबाळ फोडले. मोकळे केले थोड रक्त येई पर्यंत साफ केलं. मग बापूला बरे वाटू लागले. दुसऱ्यादिवशी माझ्या डाव्या काखेत दुखू लागले 😄. नीट तपासले तर मला पण उबाळ आले होते. मी पण 2 दिवस बापूसारखे काढले आणि बापूने माझे उबाळ फोडून मोकळे केले. हॉस्टेल मधली सगळी पोरं लय हसली. पण गोष्ट इथेच संपत नाही.
माझ झाल की बापूच्या डाव्या काखेत दुसरे उबाळ आले. मी म्हटले बापू तू माझ्यापासून लपून जास्त लाडू खाल्लेस काय? 😗😉 असे बोलून बापूंवर माणिक आणि मी लय हसलो. . बापू अंगाने धिप्पाड होता पण मनाने घाबरट होता. आणि त्याचा उलटा. दिसायला लहान पण फुल्ल डेअरिंग वाला. बापू अस काही करणार नाही मला माहित होत.. असो.. यावेळी आम्ही अनुभवी होतो. काहीही त्रास न होता 2 दिवसात ते उबाळ पहिल्याच पद्धतीने बरे केले. इथे गोष्टीत ट्विस्ट आला, मलापण दुसरे उबाळ आले उजव्या काखेत. 😂. बापू आणि माणिक जे तुटून पडले माझ्यावर. लय टर उडवली माझी. आतापर्यंत ही बातमी हॉस्टेल च्या 2 3 ग्रूप मधे पसरली होती आणि आम्हाला बघायला पोर येऊ लागली होती. बघणं कमी आणि आमच्यावर विनोद जास्त होत होते आणि आम्ही पण त्यात लय हसायचो.
मग एकमगोमाग आम्हा दोघांना पाच पाच उबाळे आले. आता आम्हाला याच काही वाटत नव्हतं. तो माझं पिळून साफ करायचा आणि मी त्याचे. ही आमची दोस्ती होती.
पाच नंतर माझी गाडी थांबली. पण बापू ने अजून 2 उबळाचे डब्बे जोडले आणि एकूण 7 झाले की त्याचे ही बंद झाले.
अशाप्रकारे आम्ही त्या उबाळ संकटातून बाहेर आलो. आणि आबा चे लाडू आयुष्यभर लक्षात राहिले.
धन्यवाद
जयंत जगताप
Comments
Post a Comment