शुभेच्छा मेसेज


    वाढदिवस शुभेच्छा मेसेज द्यावे की नाही द्यावेत
सोशल मिडिया वर आता बऱ्यापैकी आपण जाणते झालो आहोत. 14 वर्षापासून भारतात व्हॉट्सअँप ने भरपूर प्रगती साधली आहे. सुरवातीला सामान्य वापरकर्ते सक्रिय रहावे म्हणून त्यांची टीम विविध पोस्ट, फोटो, शुभेच्छा पोस्ट, मेसेज वायरल करत असत. अजूनही करतात पण आता ट्रेंड बदलला आहे. सुरवातीला डेटा लिमिटेड असायचा तेव्हा काय डाउनलोड करायचे, काय नाही, हे ठरवावं लागायचं. त्यात मोबाईल मेमरी कमी असायची ती अशा शुभेच्छा फोटो, देवाचे फोटो कधी एखादा जाहिरात करायला त्याचे व्यवसाय फोटो, काही चावट ग्रुप मधे तसे फोटो येत राहायचे आणि मग कोणते डाउनलोड करायचे कोणते नाही या विवंचनेत डोक आणि मन यांच्यात वाद व्हायचे मग त्याची भडास ग्रुप वर निघायची. मग तिथे विविध विचारांचे समर्थक आपले मत मांडून गायब होत असत. व्हॉट्सॲप तसं वाद घालायची किंवा चर्चा करायची जागा नाही ये कारण इथे खूप वेळा समोरचा नक्की काय अर्थाने लिहतोय हे समजत नाही. ही फक्त माहिती अदान प्रदान करायचं माध्यम आहे. हे आता कुठे अनेकांना  समजायला लागलं आहे. असो.. आपला विषय आहे शुभेच्छा मेसेजचा.
लेखक रवी गावडेंचा फेसबुक वर लेख वाचला आणि अनेक दिवस माझ्या मनात वाढदिवस शुभेच्छा मेसेज बद्दल लिहायचं चाललेलं ते पूर्ण करायची चालना भेटली. 
व्हॉट्सॲप तसं बघितलं तर एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी आहे. पण रोज काही कोण कोणाशी बोलत बसत नाही. तेव्हा अशा ग्रुप मध्ये वर्षातून होणारे सार्वजनिक सण व्यतिरिक्त काहीच संवाद होणार नाही. पण जर एकमेकांना त्यांच्या काही यशस्वी गोष्टी आणि आनंदी क्षणासाठी जसे, परीक्षेत पास होणे, एखाद्या स्पर्धेत यश मिळवणे, आणि सर्वात महत्वाचे वाढदिवसाला शुभेच्छा देणे. यामुळे  ज्याचा वाढदिवस असतो तो एक वेगळाच आनंद साजरा करतो. एक सकारात्मक एनर्जी त्याला मिळते. एखादा टेन्शन मध्ये असेल तर त्याला मोकळे वाटते. 
म्हणून वाढदिवस शुभेच्छा देणे गरजेचे आहे. आणि आता तर डेटा कितीही वापरू शकता. व्हॉट्सअँप मध्ये विविध वैशिष्ट्ये आली आहेत ज्यामुळे मोबाईलची जागा व्यापली जात नाही. 
त्यामुळे शुभेच्छा देत रहा, आनंद साजरा करत रहा, आपल्या मेसेज मुळे कोणाचा दिवस आनंदात जात असेल तर तेवढं करूनही पुण्य कमवत रहा आणि असे करून स्वतः ही आनंदी रहा.. 
धन्यवाद
जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)