आबा

        आबा 
               *आबा* 
आबा म्हणजे विचारांचा जाज्वल्य झरा.. 
ते एक असते ना आपल्या विचारांच्या frequency ला मॅच होणारी व्यक्ती भेटली की आपल्याला आपसूक छान वाटते तसे व्यक्तिमत्व म्हणजे आबा होते माझ्यासाठी. कधीही गावी गेले की खास आवर्जून त्यांना भेटायला जायचे म्हणून आम्ही (मनिषा आणि मी) करण्दोशी ला जायचो. दसऱ्याला ज्या निवडक व्यक्तींना आवर्जून आम्ही फोन करायचो त्यातील एक म्हणजे आबा.  आराध्यची नेहमी विचारपूस करणार, वैचारिक उंची त्यांच्या देहबोलीत दिसायची. सामाजिक कार्यात ते अग्रेसर होतेच पण कोणाची चपलुसी करणे त्यांना कधी जमले नाही आणि आवडायचे ही नाही. जे मनात तेच ओठावर. रुबाबदार कसे राहायचे हे आबांकडे बघून समजायचे. 
त्यांना जाऊन 5 वर्षे झाली पण आजही त्यांची आठवण आली की एका खास व्यक्तीला आपण गमावले आहे याची खंत जाणवते. 
आबा तुमच्या स्मृतीला विनम्र अभिवादन 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)