कनेक्शन
Connections
आज एक नवीन नंबर वरून फोन आला, नमस्कार करून त्यांनी नाव सांगितले (नाव इथे सांगत नाही) सांगलीवरून बोलतोय. माझ्या लेख त्यांना फिरत फिरत व्हॉट्सॲप वर मिळाले आणि त्यांनी आवर्जून वाचले आहेत आणि ते सांगितले. मी आभार मानले. मग त्यांनी सांगितले त्यांचा गोल्ड टेस्टिंगचा बिझनेस आहे आणि ते आमच्या कंपनीचे ग्राहक आहेत. सध्या ते भागलपूर बिहार मध्ये त्यांचा व्यवसाय करतात. टेस्टिंग साठी ते आमची मशीन वापरतात. त्या मशीन संदर्भात त्यांना मदत हवी आहे. माझे लेख आणि विचार वाचून त्यांना मी 100% टक्के मदत करेन अशी त्यांना खात्री आहे असे ते बोलले. मीही त्यांना आश्वस्त केले की आमचे ग्राहक म्हणून मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करणार यात शंका नाही. सोबत तुम्ही आमचे गाववाले आणि सोन्याच्या बिझनेस मधे आपला मराठी माणूस जम बसवतोय तर नक्कीच योग्य आणि प्रामाणिकपणे संपूर्ण सहकार्य राहील. पहिलं तर आजकाल insta च्या जगात फक्त इंस्टाग्राम स्टार लक्षात राहतात तिथे आपले लेख वाचून आपल्याला नावा सहित लक्षात ठेवले हे ऐकून छान वाटले. आपले लेख यांना प्रेरणा देतात हे ऐकून मला एखादे बक्षीस मिळाल्यासारखे व आणि आपले लेखांचे चीज झालेसारखे वाटले. सोबत ते माझे कंपनीचे कस्टमर आहेत आणि त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी योग्य ते सहकार्य करेन. म्हणजेच आजकाल कस्टमर चा विश्वास जिंकायला खूप मेहनत घ्यावी लागते तिथे आपले विचार आपले लेख आपल्यासाठी काम करत आहेत.
यातून आपण योग्य रस्त्यावर चालत आहे हा विश्वास दुणावला आणि अजून लेख लिहायला प्रेरणा मिळाली.
धन्यवाद
जयंत जगताप
Comments
Post a Comment