only change is permenant
*Only change is permenent*
*फक्त बदल हा कायमस्वरूपी असतो*
स्थलांतर हा मानवाचा स्थायी स्वभाव आहे.- डॉक्टर APJ कलाम. माणूस ओळखला जातो त्याच्या कर्तृत्व वरून.
पुरातन काळापासून अनेक माणसं विविध प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात कामानिमित्त, काही आवड म्हणून, काही लढाया जिंकून नवीन प्रदेश पादाक्रांत करून, काही या युद्धना घाबरून, आपला जीव वाचवून, अनेक जण आपल्या कामगिरीच्या जोरावर बक्षीस म्हणून मिळणाऱ्या जहागिरीचा भाग म्हणून असे अनेकविविध कारणांनी एक शहरातून- खेड्यातून दुसऱ्या खेड्यात शहरात, एक प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होतं असतात आणि आताच्या काळात तर देशांतर्गत स्थलांतर साधारण झाली आहेत. तिकडे जातात तिकडे स्थिरावतात. तिथलेच जीवनमानाचा भाग होईन जातात, जिकडे जातात तिकडे गुण्यागोविंदाने राहतात, त्या गावात, खेड्यात, शहरात, आधी राहणारे पण कुठून तरी आलेले असतात. मग यात जो कर्तृत्वाने, सामाजिक कार्याने, समाजासाठी काही तरी तळमळ असलेले, आपल्या कलागुणांनी तेथील व्यवस्था बदलतात, नवीन चांगले बदल घडवतात. जस आज अमेरिकेत अनेक भारतीय उद्योगक्षेत्रात, मेडिकल, इंजिनियरिंग, राजकारण या क्षेत्रात स्थिरावले आहेत. कधी कधी यात संघर्ष होतो ते आधी आलेले असतात ते स्वतःला तेथील मालक समजतात पण या जगात सर्वच स्थलांतरित आहेत. हे त्यांना समजत नाही किंवा त्यांची तेवढी क्षमता नसते समजायची. तरी देखील हे आमचेच, आम्हीच येथील मालक अशा भ्रमात राहणारे हळू हळू अलिप्त होत जातात, प्रवाहातून वेगळे पडत नाहीत पण सत्कार्यापासून दूर जातात आणि स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत राहतात.
पण जर सर्वांना सामावून घेतले, आपला न्यूनगंड बाजूला ठेऊन, बदल हा कायमस्वरूपी होतच असतो तो स्वीकारून, पुढे लागून जे काम करत असतात, जरी ते नवीन असले तरी, आपला वेळ, बुद्धी, श्रम देत असतात जर त्यांना साथ दिली तर नक्कीच समाजाचे हीत साधले जाते.
आजच्या काळात याच बदलाला स्वीकारण्याची कमतरता जाणवत आहे आणि कुठे न कुठे मनुष्यप्राण्यची वाटचाल मंदावत आहे असे दिसत आहे.
लेखक
जयंत जगताप
Comments
Post a Comment