भूल चूक माफ

                       *भूल चूक माफ* 
विमानातील प्रवास म्हणजे माझे लिखाण करायचे सर्वोत्तम ठिकाण. एक चहा किंवा कॉफी घ्यायची आणि मग ज्या वेगाने विमान उडत असते त्या वेगाने माझे डोके लेख लिहायला धावत असते. 
राजकुमार रावचा आताच 2 महिन्यापूर्वी आलेला सिनेमा *भूल चूक माफ* पहिला.अतिशय सध्या गोष्टीतून दिलेल्या खूप मोठा संदेश. मला समजलेलं संदेश खालील प्रमाणे.
1. कोणाला आपल्या शब्दांनी आपल्या कृतीने दुखावू नका
2. सत्कर्म करत राहा, दान धर्म करत रहा. 
3. भ्रष्टाचार करून, लाच देऊन कोणाचे दुसऱ्याचे नशिबाचे हुसकावून घेऊ नका. 
4. आणि कर्म करत रहा.. फळाची अपेक्षा ठेवू नका. 
नाहीतर तुमचेच आयुष्य पुढे सरकणार नाही. 
वाराणसी शहरात घडणारी ही गोष्ट. दोघांचे एकमेकांवर खुप प्रेम, मुलाचे घरचे लग्नाला तयार पण मुलीच्या वडीलांना मुलगा सरकारी नोकरीवाला हवा असतो. त्यात मुलाला पळून जाऊनही लग्न करायचे नसते. 
 मग यासाठी काय करायचे तयार तर सेटिंग लाऊन पैसे भरून, लाच देऊन सरकारी खात्यात नोकरी लावली जाते. Joining letter येते आणि पटकन लग्नाची तारीख काढली जाते 30 तारीख. 29 तारखेला हळदीचा कार्यक्रम होतो रात्र होते आणि नवरदेव झोपतो. सकाळी उठतो तर परत सर्वजण हळदीच्या कार्यक्रमाची तयार करत असतात. परत हळद होते परत सर्व झोपतात. नवरदेव उठतो परत तारीख असते 29. परत हळद सुरू होते. 10 वेळा 20 वेळा तेच चक्र सुरू असते. बाकी सर्वांना साठी अजून हळद झालीच नसते, फक्त नवरदेव la 29 संपते आणि परत  29 मधेच उठतो. 
मग सुरू होतो प्रवास कारण शोधायचं. 
महादेवाला नवस बोलला जातो. गाईला भोजन दिलं जात. मंदिरातील ज्योतिष्य सांगतात कोणाला दुखवले असेल तर क्षमा मागा. मग सर्वांची माफी मागितली जाते. कळत नकळत कोणाला ओरडून, रागावून बोलले असेल तर माफी मागितली जाते. तरी देखील अजून रोज 29 मध्येच सकाळ होते आणि हळद होतच असते. 
मग मंदिरातील पुजारी सांगतात कोणाचे काही हिसकावून घेतले आहे का? जे दुसऱ्याच्या नशिबात असेल किंवा त्याने मेहनत केली असेल परंतू आपण जोर जबरदस्तीने घेतले असेल त्यामुळे तो दुखावला असेल किंवा त्याचे बरेवाईट झाले असेल तर त्याचा शाप लागला असेल. 
मग शोध सुरू होतो आणि येऊन थांबतो सरकारी नोकरी वरती. जी नोकरी पैसे चारून चुकीच्या मार्गाने मिळवलेली असते तिथे अगोदरच सिलेक्ट झालेला तरुण joining letter न आल्या मुळे हताश, निराश झालेला असतो आणि 29 तारखेलाच गंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या करत असतो. ज्या नोकरीमुळे लग्न होणार असते त्यामुळेच दुसरे एक जीवन संपणार असते. शेवटी मनावर दगड ठेऊन हिरो ती नोकरी ज्याची असते त्याला देतो आणि तेव्हा कुठे 30 तारीख उजाडते. 
आता लग्न दिवस असतो आणि कोणाला नोकरीचे काही न सांगता हा गुपचूप लग्न ही करू शकला असता. पण इतक्या अनुभवातून आपण काय शिकलो याची खरी इथे परीक्षा असते. लग्न मंडपात मुलीच्या वडीलांना सरकारी नोकरी गेल्याचे खरं खरं सांगतो. शेवटी त्याच्या उशिरा का होईना पण आलेल्या प्रमाणिकपणाला  यश मिळते. 
सोबत सिनेमा आपल्याला, समाजाला वरील चांगले संदेश देऊन जातो.. भूल चूक माफी मागा,  दुसऱ्यांना माफ करा  आणि सर्वांशी आनंदाने जगा. 
लेखक
जयंत जगताप
 


 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)