व्यावसायिक जीवनाची 18 वर्ष

        *व्यावसायिक जीवनाची 18 वर्ष*
या जून मध्ये माझ्या व्यावसायिक जीवनाची 18 वर्ष पूर्ण झाली. 18 वर्षात मूल परिपक्व होतात तसेच आपण ही व्यावसायिक जीवनात परिपक्व झालो का याचा हा आढावा. 
2007 ते 2025 या कालावधीत अनेक अनुभव नवीन गोष्टी, असंख्य व्यक्ती आणि वल्ली भेटले. खूप शिकलो, घडलो, स्वतःचे गुण विकसित केले. Weighing इंडस्ट्री मध्ये एक्स्पर्ट म्हणून नाव कमावले. 2023 मध्ये कॅम्प ऑल इंडिया "सर्विस चॅम्पियन ऑफ the year"  हा अवॉर्ड मिळवलां आणि टीम लीडर म्हणून मॅनेजमेंट मधे काम करू लागलो. इथे ही नवीन नवीन सकारात्मक बदल घडवत busines मधे  नावीन्य आणत आहे. 
  व्यावसायिक जीवनाच्या करियर मध्ये गेली 18 वर्षे अनेक देश फिरलो, भारतात तर सर्व राज्य पालथी घातली, छोटी छोटी खेडी, शहरे, जंगलातील सिमेंट प्लांट, स्टील, पॉवर प्लांट, समुद्र किनारी असलेली पोर्ट, अगदी गुजरात चे प्रसिद्ध mundra पोर्ट ते ओडिशा मधील धामरा पोर्ट ते दक्षिणेतील कृष्णा पटनम पोर्ट. 
कोणते राज्य बाकी राहिले नाही. पुर्वेकडील राज्य शिल्लक होती तीदेखील गेल्या 2 वर्षात नवीन प्रॉडक्ट लाइन हॅण्डल करायला लागलो आणि फिरून झालीत. 
तसा मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आणि सोबत ऑपरेशन मॅनेजमेंट मधे पार्ट टाइम पदवी घेतली आहे. पण नेतृत्व करणे, टीमला सांभाळणे, मोटीवेट करणे, अवघड कामे खांद्यावर घेणे आणि एकहाती मार्गी लावणे हे कसब डिप्लोमा पासून अंगात रुजलेले. मुंबई मध्ये एक मंडळाचे नेतृत्व करताना हे सर्व गुण आपोआप अंगांत रुजत गेले. 
सोबत वाचन करणे आणि आपल्या विचार लिखाण स्वरूपात मांडणे हे आपले छंद  सुरूच आहे. सहसा आपण सकारात्मक विषयावर लिहत असतो. आजकाल कोणी 1 मिनिटांचे व्हिडिओ सुद्धा नीट बघत नाहीत तर मोठाले लेख कोण वाचणार हे ओळखून मी माझी शैली छोटे लेख , कमी शब्दात पूर्ण आशय समजावणे आणि आपल्याला जो संदेश द्यायचा आहे तो पोहचवणे असे लिखाण करत असतो. सोबत आपली फॅमिली life, छंद, मंडळ, सामजिक कार्य  अशा गोष्टी सुरूच आहेत. 
एकंदरीत प्रवास जबरदस्त सुरू आहे. काही लक्ष्य प्राप्त झालीत अजून मोठे लक्ष्य प्राप्त करायची आहेत आणि त्या दृष्टीने काम आणि प्रवास सुरू आहे. 
धन्यवाद
जयंत जगताप.

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)