आराध्य डायरी
23 सप्टेंबर 2018 ला आम्ही कोपरखैरणे च्या घरातून घाटकोपर ला भटवाडी मध्ये राहायला आलो. ऐरोलीतील स्नेहल मॅडम ने दिव्यम मध्ये ऍडमिशन घ्यायला सांगितले, कोपरखैरणे वरून कुरल्याला जाऊन येणे खूप त्रासदायक व थकवणारे होत होते. हे सर्व आरुला थकवणारे होते. प्रवास करून थकल्यामुळे थेरेपीचा इफेक्ट जास्त होत नव्हता आणि तो वरच्यावर आजारी पडत होता.
हे सर्व टाळण्यासाठी आम्ही कुर्ल्या च्या जवळ घर शोधत होतो चेंबूर, टिळकनगर, घाटकोपर, चुनाभट्टी तसेच हार्बर लाईन वर sanpada ह्या ठिकाणी देखील घर शोधात होतो.
1 दीड महिना शोध घेतल्यावर सर्व बाजूनी विचार करुन मग घाटकोपर ला भटवाडीत रुपये15हजार भाडे व रुपये 50हजार डिपॉजीट वर एक 1bhk रूम भाड्याने घेतला.
इथे येऊन आता दिव्यम चा रोजचा प्रवास चालू झाला होता. कधी ट्रेन कधी रिक्षा कधी बाईक वर असा प्रवास चालू होता.
हळूहळू आरू मध्ये बदल जाणवत होता, मनीषा ची मेहनत चालू होती आणि अजूनही आहे, असे करत करत 3 महिने झाले व एक दिवस असे समजले की स्नेहल मॅडम, दिव्यमचा राजीनामा देत आहेत. हा आमच्या साठी खूप मोठा धक्का होता . कारण फक्त त्यांची OT ची थेरेपी मिळावी म्हणून आम्ही इथे आलो आहोत आणि त्यांनी राजीनामा दिला आहे.
परत आमची स्थिती तळ्यात-मळ्यात झाली आहे.
आता 2 पर्याय दिसत आहेत एक तर स्नेहल मॅडम ची थेरेपी चालू ठेवण्यासाठी ऐरोलीला शिफ्ट व्हायचे किंवा घटकोपरमध्ये नवीन OT थेरपिस्ट शोधायची.
लक्ष्य नावाचे एक थेरेपी सेन्टर आहे इथे ते पण अनुभवले पण त्या मॅडम जास्त वेळ देत नाहीयेत.
स्नेहल मॅडम ने त्यांची एक जुनी मैत्रीण आहे श्रुती नावाची तिचे पण घाटकोपर मध्ये नवीन सेन्टर चालू केले आहे तिथे आता थेरेपी चालू आहे.
स्पीच साठी ऐरोलीत सोनाली मॅडम कडे जात आहे.
मानिषाची खूप धावपळ होत असते पण ती हे लीलया पेलत आहे. मी site वरून आलो की जमेल तेवढी मदत करण्यासाठी धडपडत असतो.
माझा कामाचा व्याप पण खूप वाढला आहे. आता managment आणि नेतृत्व गुण विकसित होत आहेत.
जबाबदारी वाढली आज तसे माझे लिडरशिप ही वाढत आहे.
सध्या सुरू असलेले प्रयत्न आरू वर त्यांचा परिणाम जाणवत आहे. तो आता जास्त हुशार आणि ऍक्टिव्ह जाणवतो.
एकदा बोलायला लागला की खूप गोष्टी लवकर शिकेल तो.
आज 21.3.2019 गुरुवार आज रंगपंचमी आहे आणि रुद्र चा 3 रा वाढदिवस आहे आज.
4.7.2019
1. डॉक्टर मीरा शहा यांच्याकडे स्पीच थेरपी चालू केली आहे
2. डॉक्टर श्रुती कराडकर यांच्याकडे ओकपेशनल थेरेपी चालू आहे.
3. होप फॉर bright future यांच्या होमिओपॅथिक गोळ्या चालू आहेत
4. आखडी येऊ नये म्हणून वालपरिन 5ml व लवेरा 1.5ml औषध चालू आहे.
5. माझी व मानीषाची मधवप्रिया मध्ये आयुर्वेदाचर्या संतोष देशमुख यांच्याकडे आयुर्वेदिक पंचकर्म चालू आहेत.
27 june 2022
जुन 2021 मध्ये कोपरखैरणे मध्ये राहायला आलो. विघनहर्ता सोसायटी मध्ये 8 महिने B506 मध्ये राहिलो. नंतर B504 मध्ये शिफ्ट झालो.
आराध्य मध्ये पहिल्या पेक्षा खूप प्रगती झाली आहे.
त्याला अजून valprin 500mg 5.ml ani levera 200mg 1.5ml रोज 2 वेळा चालू आहे.
सोबत risdon 1mg ची half गोळी रोज चालू आहे.
मागील 3 महिने त्याला arpizol ही गोळी चालू होती ती आता बंद केली आहे. 1 आठवड्यात आता तो परत चिडचिड करू लागला आहे. कधी कधी डोकं आपटतो. मनीषा ला आणि मला कधी कधी हाताने ढकलतो.
1 महिना निरीक्षण करून मग पुढील निर्णय घेऊ.
Comments
Post a Comment