यात्रा 2019 गावात पोहचण्याचा प्रवास

एक महीना अगोदर गावच्या यात्रेची तारीख समजली आणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही उत्सहाने सहकुटूंब जायचे ठरवून तयारीला लागलो. मनीषा आणी मी दोघे जोरात तयारी करत होतो. मागील यात्रांच्या आठवणीत रमत होतो. हळुहळु दिवस जवळ येत होते तसे मन गावी जात होते. लवकरच आपणही पोहचणार हा विचारच रक्त सळसळवायला पूरेसा होता. यात्रा 15 दिवसांवर आली आणी गावाचा सपता चालू झाला। रोज गावची मेजवानी आणि भक्तिमय असे वातावरण ची बातमी कळू लागली। कामाच्या व्यापात आपण हे सर्व आपलयाला अनुभवता येत नाही याची खंत वाटत होती।
7 दिवसात सपता संपला आणि आता आस लागलीं होती ती यात्रेची।

यात्रेच्या 3 दिवस अगोदर गाडीचे तिकीट बुक केले। सर्व खरेदी केली पण नियतीच्या मनात वेगळेच होते। मनीषयाची तब्येत बिघडली,  तिचे आणी आरूचे गावी येणे रद्द झाले। माझही मन हेलकावे खाऊ लागले। पण गावाची यात्रा आपल्या वाड्यावर आहे म्हणून जाणं गरजेच होत।गावी जाऊन आपलं शांत पणे यात्रा करून परत यायचे असा मनाशी निश्चय करून, शेवटी मनीषा व आरु शिवाय 3 जानेवारी ला मुंबई हुन पुणे ला ऑफिस च्या कामासाठी निघालो व तिथून पुढे संध्याकाळी st गाडी ने गावी  निघालो। ऑफिस मधून निघायला उशीर झाला होता व पाचवड वरून शेवटची st  8 ची होती ती पकडणे गरजेचं होतं, ती सुटली तर प्लान B  म्हणून गावात कोणाला तरी कळवने व घ्यायला बोलवायचे असा विचार करून गणेश गोळे ला फोन केला, योगायोगाने तो देखील पुण्यातून निघाला होता आणि माझ्या मागेच होता। आम्ही दोघानी पाचवड मध्ये भेटायचे  व एकत्र महू ला जायचे ठरवले। 
रात्री 7:30 ला मी आणि 7:45 ला गणेश पाचवड ला पोहचला। 8 ची गाडी पकडून आम्ही महू चा प्रवास चालू केला आणी हा प्रवास माझे पुढच्या 4 दिवसांचा Turning point  ठरला।

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)