हर हर गंगे हर हर महादेव

हर हर गंगे हर हर महादेव

2009 ला पहिल्यांदा मला वाराणसी ला येण्याचा योग्य मिळाला. त्यानंतर आता पर्यंत 5 वेळा आलो आणि प्रत्येक वेळी विश्वनाथ दर्शन घेऊनच माघारी परतलो.
पहिल्या भेटी वेळेस माझ्याही मनात, काशी म्हणजे हिंदू चे प्रथम दैवत विश्वनाथ आहे म्हणजे असणार ही भव्य दिव्य अशी कल्पना होती. पण दर्शन घेताना गल्लीगल्लीतुन कधी मंदिरात पोहचलो आणि बाहेर आलो हे समजलच नाही, मंदिराचा गाभारा, कळस, नक्षीदार खांब, विविध मूर्ती दर्शन अस काही झालंच नाही. माझं मन निराश झालं. आपलं सर्वोच दैवत अस गर्दी मध्ये कोंडून पडलंय हे मनाला लागलं. अस अनेकांच्या मनाला टोचल असणार पण हे सिद्ध कार्य करायला शासकीय मनोबल आणि शक्ती लागणार होती. दोन्ही सरकार त्या वेळी हिंदू विरोधी होती. शेवटी आपलं मन मारून गंगेत फेरफटका मारून पुढे निघालो.
त्यानंतर 2017 ला परत जाण्याचा योग आला आणि या वेळी इथे बदल दिसू लागले, गो शाळा तयार झाल्या होत्या. दर्शन रांगेत बदल केला होता.भक्तच्या आस्था ची काळजी घेतली जात होती. परत 2019 ला आलो तर मंदिर परिसरात काम चालू होते. मंदिर कूस बदलत होते. हिंदू जागा होत आहे हे जाणवलं. सरकार योग्य दिशेने काम करत आहे हे जाणवलं.
आणि आज परत डिसेंबर 2021 ला आलो आणि मन आनंदाने नाचू लागले. मंदिराचा भव्य दिव्य कळस, ते गाभारा, भक्तांची आनंदात दर्शन घेण्याची मांदयाळी, मोकळी जागा जागा बघून मन प्रसन्न झाले, आत्मिक, भावनिक, आध्यत्मिक आनंद लाभला.
ही पोस्ट राजकीय नाही, ही आहे फक्त हिंदू म्हणून आभार व्यक्त करण्याची वेळ. धन्यवाद मोदीजी, धन्यवाद योगीजी.
जय बाबा काशी विश्वनाथ....

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)