जयंत जगताप कविता


1.योद्धा है हम लढेंगे लढेंगे..

योद्धा है हम लढेंगे लढेंगे...

हर संकट का मुह मोडेंगे मोडेंगे...

 चल रहे जो लेकर महान विरासत,  (बेस्ट सर्विस की)... यूसे  ऐसेही शाश्वत बनाकर  रखंगे... रखेंगे...

कई संकट आएंगे...जायंगे.... हम ऐसे ही नई उंचीइया छूयेंगे ...छूयेंगे...

हा कभी कभी.. हम भी होते  है घायल,... डूबते है कसी घहराई में.... 

मगर हर बार भरे गहरी सास, फिर सतह पर. उभरेंगे... उभ्रेंगे... 

हार जीत तो होती रहेगी

हार.... जीत तो होती रहेगी...

ऐसे ही नये मकाम बनायेंगे...बनायेंगे...

योद्धे है हम लढेंगे लढेंगे.

 योद्धे है हम लढेंगे लढेंगे....

Cheers to all service Team... 



हिंदू कशाप्रकारे उठून उभा राहतो यावर सुचलेली छोटीशी चारोळी 🙏

योद्धे है हम लढेंगे लढेंगे,
हर संकट का मुह मोडेंगे मोडेंगे.
चल रहे जो लेकर महान विरासत,
उसे रखंगे ऐसेही बनाकर शास्वत,

कई आये कई गये, मिट गये खुद मिटाते मिटाते,
हा कभी हम भी हुवे है घायल, डूबे है कसी घहराई में, पर
मगर हर बार लिये गहरी सास, फिर उभरे है सतह पर.
हार जीत तो होती रहेगी, योद्धे है हम लढेंगे लढेंगे.


2.  -----////--------*ज्ञानाचे पर्वत* -----////-----
शाळेत येऊन अज्ञानाच्या च्या अंधारातून आम्ही निघालो बाहेर, पाहता ज्ञानाच्या प्रकाशात होते ज्ञानाचे पर्वत!
त्या पर्वतातून वाट काढत आम्ही पोहचलो शिखरावरी. 
पाहता खाली वाढली मनाची धकधक, 
पाहता वरती अजून होते ज्ञानाचे पर्वत, जाता चढत, वाढत जाती हे  ज्ञानाचे पर्वत. 
कधी संपतील ना हे ज्ञानाचे पर्वत, कधी संपतील ना  हे ज्ञानाचे पर्वत.


   3. ------/ -----/   *आठवणी*----/-----//-----
सगळ्याच आठवणी कागदावर उतरवायच्या नसतात. 
काही मनाच्या एका कप्प्यात दाबून भरून ठेवायच्या असतात. ||
जस शेतकरी पोत्यामध्ये धान्य दाबून भरून घट्ट गाठ मारून ठेवतो आणि अवघड काळात काढतो . ||
काही  तसच आठवणी मनात  घट्ट बांधून ठेवायच्या असतात..
मग निवांत प्रवासात खिडकीतून बाहेर टक लावून, एक गरम चहा हातात घेऊन बाजूच जग विसरून ती आठवणीची गोठडी खोलायची असते..||
हळू हळू, हळू हळू, एक एक आठवण डोळयांसमोर बघायची असते. 
जसा जादूगार त्याच्या गोठडीतुन एक एक जादू बाहेर काढत असतो तशी ही आपल्या आयुष्याची जादूची गोठडी असते ... 
मग एक एक आठवण डोळयांसमोर बघत, गालातल्या गालात हसायचं असत.. चांगल्या आठवणी परत आत ठेवत वाईट आठवणी  मागे जाणाऱ्या झाडांसोबत सोडायाच्या असतात. 
गालात थोडं हसत असताना, शेजारचा  आपल्याला वेडा समजत असताना, त्यांना दुर्लक्षित करून आपल्या जगात रमायचं असत, कारण जे आपल्याला दिसत ते त्याच्यासाठी अस्तिवातच नसत.. 
आयुष्य पण असच असत, ज्याचं त्याच वेगळं असत. काहींना हे आभाळच सर्व काही असतं.. तर काहींना हे.. फक्त एक आकाश गंगेतला एक खडा भासत... 
म्हणून आपल जग आपण ओळखायचं असत.. हसत हसत आठवणी साठवायच्या असतात ..... आणि अवघड काळात दवा म्हणून आठवायचा असतात. 
.. 

-----जयंत जगताप

   4.  ----///////-----     *शाळा*----//////----/
शाळा म्हणजे शाश्वत लळा,  (शाश्वत मधला शा आणि लळा मधला ळा)
आयुष्यभर आठवत राहतात मैत्रिच्या गोड झळा. 
आठवली शाळा की वाहतात आनंदअश्रू खळखळा,
शाळेत असताना घंटा वाजली की सर्व जण बोलायचे चला घरी पळा, पण आज दिसली शाळा की मन म्हणते अरे लेका... परत शाळेकडे वळा, परत शाळे कडे वळा
शाळा म्हणजे मित्रांचा शाश्वत लळा

5. -----////-------*आज उजाळा आठवणींना द्यायचा*---/////
आलो इथे वडिलांचे बोट धरून, पण जाताना मन इथेच गेलो सोडून 
आज उजळा त्या आठवणींना द्यायचा...
शाळेच्या चढलेल्या पायरीला आणि बसून शिकलेल्या बेंचला.
आज बघायच आहे,  आहे का माझं नाव, अजून त्या करकटने कोरल्याला बेंचवर.
आठवायची आहे पोहचायची घाई 7 च्या आत गेट वर,
आज उजळा त्या आठवणींना द्यायचा.
व्हरांड्यात उभे राहून प्रार्थना बोलण्याची वेगळीच मजा होती, उंची लहान होती पन आपल्या पुढे कोणीतरी आहे यातच खुशी होती. 
आज उजाळा त्या आठवणींना द्यायचा
पहिल्या तासाला गृहपाठ बघायला मॉनिटर यायची आणि नजर चुकवून एकच वही दोघेजण धाकवायचो
मराठी नंतर इंग्रजीचा तास यायचा आणि आमची बत्ती गुल व्हायची.
आज उजळा त्या आठवणींना द्यायचा
गणितात खरी मजा यायची कारण आकडेमोड करायला लय सोपं वाटायचं. भूगोल शिकताना मन त्या प्रदेशात जायच आणि नागरिकशास्त्र आलं की परत वर्गात यायचं.
PTचा  तास  फक्त झाडांमध्ये खेळण्यात जायचा कारण  वर्गात अगोदरच होते खोखो चॅम्पियन संदेश आणि कब्बडीचा चॅम्पियन कैलास होता आम्ही फक्त पाण्याच्या बाटल्या संभाळायला असायचो.
आज उजळा त्या आठवणींना द्यायचा.
परीक्षा असताना बाजूला मागच्या वर्गातील विध्यार्थी असायचा, मग कधी कधी आपला पेपर सोडून त्याचाच पेपर सोडवायचा.
कॉपी कधी केली नाही पण मागे पुढे दाखवून आणि बघून लिहल नाही असं कधी झालं नाही 
आज उजळा त्या आठवणींना द्यायचा.
सरांनी प्रश्न विचारला की पाहिले मागे बघायच, चुकून मागचा उठला तर आपण वाचलो म्हणत आपली मान खाली घालायची, तेव्हा जी मजा यायची ती परत आज आठवयाची आहे अन...
आज उजळा त्या आठवणींना द्यायचा आहे.
                   -जयंत जगताप

6. ---/////------हम लढेंगे, हम जीतेंगे---///----

2019 मध्ये मी कानपूर ल साईट वर होतो तेव्हा मुंबई मध्ये अचानक आराध्य ल खूप मोठी आखडी आली होती. 40 मिनिटे तो डोळे वर करून होता. तेव्हा मनीषा ने अशक्यप्राय अशा परिस्थितीतून आराध्य ल वाचवलं आहे. मी धावत पळत मुंबईत आलो तेव्हा तो नेरूळ ल sunshine hospital मध्ये ऍडमिट होता आणि आणि बेशुद्ध होता त्या अवघड परिस्थितीत  हॉस्पिटल मध्ये पोर्च  मध्ये  बसलो आणि खालील कविता मला आराध्य साठी सुचली. 

"हम लढेंगे हम लढेंगे, हम जीतेंगे हम जीतेंगे
हमारी राह है मुश्किल पर नामुनकीम नही!
राह मे है कही मोड पर अंत नही है!
संकटो से डरकर भागने वाले हम नही है!
हम लढेंगे हम लढेंगे, हम जीतेंगे हम जीतेंगे!
जीतनी बार गिरेंगे, दूगने हौसले से ऊठेंगे!
माना मंजील हमारी दूर है, मगर जीते बिना रूकना हमे भी कहा मंजूर है!
मेरे बेटे तेरी रास्ते के हर तूफान को हम पलट देंगे, तेरी खूशी तेरी कदमो मे लाकर ही दम लेंगे!
बहुत देखे होंगे भगवान तुमने, अब हमे भी देख लेना!
तूम सितम ढालते रहना.. हम हस हस के उन्हे सेह लेंगे!
एक दिन तूम भी देख लेना हमारे हौसलो के सामने तूम्हारे सितम भी फीके होंगे!

हम लढेंगे हम लढेंगे, हम जीतेंगे हम जीतेंगे"

जयंत जगताप


Autism (स्वमग्न) हा मेंदूचा आजार आहे. तो माझ्या मुलाला आहे. आता तो 10 वर्षाचा आहे. त्याला बोलता येत नाही. तरी त्याला काय वाटत असेल हे मी  त्याच्या भावना मी या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

7. -- /////---*मला चालायचय, मला जिंकायचंय*-----/////-----
हो मी आहे हळू, मला कळत कमी.. पण मला चालायचय..
         तूमचे शब्द नाही कळत मला,
म्हणून कळतच नाही अस समजू नका मला, 

माझ जग आहे वेगळ, जे मला दिसत ते तूम्हाला नाही दिसणार 

असतो मी जिथे तिथे तूम्ही नाही येऊ शकणार.

बोलतो मी  हवेशी, उडतो मी आकाशी
क्षणात इथे क्षणात तिथे असतो मी फिरत
का जखडू मी स्वताला तूमच्या बंधनात
पण मी करतोय प्रयत्न येण्याचा तूमच्या जगात..

मला चालायचय..मला धवायचंय...मला जगायचंय तुमच्या सारख... 
आई किती काळजी तू करत असतेस
मी उंच उंच चढत असतो, तूझा जीव धाकधूक होत असतो
तू रागावलीस की मी हसून तूझी जीरवत असतो.

बाबा माझा हीरो आहे, मला हव ते पुरवत असतो
त्याच्याबरोबर सर्व जग फिरत असतो..
पण संध्याकाळी तूझ्याच कुशीत विसावा घ्यायचा असतो..

तूम्ही असताना माझे हात पाय, मला काय काय कमी आहे.
पण मला चालायच आहे तूमच्यासोबत धावयच आहे.मला बोलायचं आहे, मला खूप सांगायचं आहे. 

*मला चालायचय, मला जिंकायचंय*-

  तुमचाच आरू

शब्दांकन- जयंत जगताप
समर्पित- आरूची आई मनोरमा जगताप



8. गेले 17 वर्ष मी सर्व्हिस इंजिनिअर म्हणून काम करत आहे. सर्व्हिस मध्ये वर वर आपल्याला दिसत की मस्त पैकी फिरायला भेटत, नवीन ठिकाणे बघायला मिळतात, हॉटेल मध्ये जेवायला भेटत. पण त्यामागे खूप त्याग ही करावा लागतो. सतत प्रवास म्हणजे दगदग. घरातील, नातेवाईकांचे समारंभ, कार्यक्रमात उपस्थित राहायला भेटत नाही. यावर  *सर्व्हिस इंजिनिअर की लाईफ* ही कविता लिहिली आहे.

"सर्व्हिस इंजिनिअर की लाईफ, एक अलग तरह की लाईफ होती है..  
जैसे नेचर के 3 मौसम होते है.. बारिश, थंडी और गरमी, वैसे सर्व्हिस इंजिनिअर के 3 मौसम होते है, installation, AMC और Breakdown.. 
जैसे बारिश कब और कबतक  होगी नहीं होता है पता .. वैसे installation  कब और कबतक  चलेगा  किसिको नहीं होता है पता...
थंडी मतलब AMC या CMC होता है....
थोडा नरम-गरम होता हैं... ये अच्छा लगता है, लेकीन जलदी खतम होता है.. 
गरमी मतलब breakdown के जैसे होता है.. 2
आप कूछ भी कर लो पसिना तो निकलता है..
लोग राज्यो को जानते है उनके tourist point से..2
Service engineer उन्हे जानते है customer के नाम से.. 
आप कहो गोवा के बीच, वो कहेंगे फारमा के बीच.. 
आप कहो ओरिसा के टेंपल, वो कहेंगे पोर्ट और स्टील के सँपल.  
वैसे हैदराबाद femous है...?   बिर्याणी और रामोजी फिल्म सिटी के लिये.. 
लेकीन हम तो देखते है dr. Reddy, granual, hetero aur piramal जैसे फारामा के अजुबो के लिये.. 
जब लोग केहते हैं चलो तामिळनाडू जाके टेस्ट करेंगे डोसा और रस्सम..
हमारे इंजिनिअर केहते है चलो टेस्ट करेंगे सिमेंट मे कित्ना है slag और जीपस्म... 

घर वाले हमे समजते है मिलिटरी मॅन की तरह.. 2
कब आते..कब जाते.. किसको नहीं होता है पता.. 
घर के डेली रूटीन का टाइमटेबल नहीं होता पता, लेकीन..
 कोनसी फ्लाईट कब उडेगी ऑर कोनसी ट्रेन कब चुटेगी ये पुरा ये पुरा  है पता..
घर का राशन और बच्चेके school ke नंबर नहीं है पता, 
लेकीन AOP, inventary और रेव्हेन्यू के नंबर पुरे  है पता... 

हमारे कलिग ही...हमारे दोस्त होते है, क्योंके जब साईट पे हम  फसते है,  तो वही हमारे savior होते है.. 
इसीलिये, भले हमे नहीं होते रिस्तेदर के function पता..2
अपने service दोस्त के birthday होते है पता...

कभी होता हैं कोई फॅमिली फंक्शन, तो हम होते है साईट पर या customer के साथ call पर...
इसिलीये  Saturday-Sunday नहीं, हमारी छुट्टी है कस्टमर मुडपर...2

फिरभी घरवाले छीडकते है जान हम पर.. 
और, कंपनी को thanks, की देती हैं ध्यान हमारी  सेफ्टी  और हेल्थ पर.. 
क्योंकी.. क्योंकी... सभी को है पता...
कस्टमर satisfication और रिपीट बिझनेस की जिम्मेदारी,  सर्व्हिस के बॅक बोन पर...  सर्व्हिस के बॅकबोन पर"....2


लेखक जयंत जगताप

https://www.instagram.com/reel/C-U7rEhAou74fCfkGG6nx1qPWbWhzbQ0d22cOw0/?igsh=MWtjMHVxZmVyY2M4cg==

 9.   *मी येतो तुम्हाला एकजूट करायला आवर्जून....*
मुर्त्या कितीही बसल्या तरी बाप्पा च भक्त एकच,
मुर्त्या कितीही बसल्या तरी बाप्पा च भक्त एकच.. 

मला कोणीही, कसही, कुठे ही,  छोटा आणि मोठाही... बसवला तरी बाप्पा मी एकच... बाप्पा मी एकच.. 

कोणी आणतो नारळ कोणी आणतो मोदक.. कोणी आणतो दुर्वा तर कोणी पैश्याच्या माळा..तर कोणी सोन्याचा मोदक..

कोण काय आणतो हे मी बघतच नाही, कोण काय आणतो  हे मी बघतच नाही... 
रिकाम्या हातानं आला तरी भक्तांच्या मनातील भक्ती मला दिसल्या शिवाय राहतच नाही..
ह्याच्या भारी की त्याचा भारी, हा मोठा की तो मोठा हे नका करू.. 
तुमच्या सर्वांसाठी बाप्पा मी एकच.. बाप्पा मी एकच... 
मी आणतो आनंद घेऊन जातो विघ्न..
मी येतो तुमचा उत्सह बघायला.. नाही येत डेकोरेशन च्या स्पर्धा बघायला.. 
आणि शेवटी....
मी येतो तुम्हाला  एकजूट करायला आवर्जून.....
 नका करू विभागण्या माझ्या, माझ्या नावाला लाजवून......
मी येतो तुम्हाला एकजूट करायला आवर्जून.....

कवी जयंत जगताप..
7738022343..

10. आज को बेहतर बनाना फर्ज हामारा है.. 
जो बित गया उस कल की ज्यादा सोचना नही...
आने वाले कल के बारें सोचने मे ज्यादा वक्त बिताना नहीं.. आज को बेहतर बनाना फर्ज हमारा है.. 
जो आज है... वो कल नही था, जो आज है, वो शायद कल नही होगा.  जियो तो आज मे.. कल मे सिर्फ यादे होती है... जो आज हम काम करेंगे, वो कल की यादे होंगी.. 
ज्यादा फिकीर करके कोई लकिर बदलती नहीं. 
जो हो गया सो बीत गया.. उसे कोई बदल नहीं सकता.., 
आने वाला कल हम लिख सकते हैं.. .
आज उसके लिये हम मेहनत कर सकते हैं..
आने वाला कल हमारा है.. मेहनत करना जिम्मेदारी हमारी है.. 
जो बित गया उस कल की  ज्यादा सोचना नही...
आने वाले कल के बारें सोचने मे ज्यादा वक्त बिताना नहीं.. आज को बेहतर बनाना फर्ज हमारा है.. 
जयंत जगताप 

11. Walk like a Legend
Walk like a Tiger
Walk like a soldier
Walk towards Horizon.

Walk like a Hero
Walk like a deer
Walk with out fear
Walk towards goal
Walk like a Legend

Walk walk walk
Walk with love
Walk with harmony
Walk like arrow
Walk like sword
Walk like bullet
Walk like a Legend 

Walk like Aai
Walk like Baba
Walk walk walk

 By Manorama & Jayant

    12.          स्पिरिट

माझं कोणी आहे की नाही, यापेक्षा मी कोणाचा तरी आहे हे महत्वाचं,

चालताना वाटेत काटे पेरले तरी काढणारा कोणीतरी पुढे उभा आहे हे महत्वाच
पायात काटा घुसेल की नाही माहीत नाही पण जो आतुरतेने वाट पाहतोय,
 त्यासाठी मी काट्यात घुसून जाईन हे महत्वाच.
भले अवघड चढण एकटा चढशील पण उतरताना आधार असेल हे महत्वाच. 
आयुष्य प्रत्येकाचं एकदाच असत, पण ज्याला जगण्याचं स्पिरीट मिळालं तो अनेकदा जगत असतो हे महत्वाच..

जयंत जगताप

  13.               स्त्री तू स्त्री म्हणून श्रेष्ठ आहेस
तू रांगडा उंच कातळ आहेस तर ती तुला पाझर फोडणारी नाजूक कळी आहे..
तुझ्या आत दडलेले प्रेम बाहेर काढणारी ती सुंदर प्रेयसी आहे..
तुझ्या रांगड्या स्वभावाला आवरणारी ती प्रेमाची लगाम आहे.. 
तू कितीही उंच भरारी घेतलीस तरी तिच्या मनात खोल रुतून बसण्यात खरी मजा आहे. 
जिथे तू थकतोस तिथे तुझ्या पाठीवर हळुवार हात फिरवरून पुन्हा उभी करणारी जननी आहे. 
असंख्य घाव होऊनही न फुटणारी तुझी छाती आहे तर ममतेने पाझरणारी ती जगाची माऊली आहे. 
दोघांच वेगळपण आहे म्हणूनच एकमेकांच्या गरजेचे आहे. 
एकसमान झालात तर चुंबकाचे एकच ध्रुव बनून कायमचे एकमेकांपासून दूर जाल. 
म्हणून पुरुष तू पुरुष म्हणून श्रेष्ठ आहेस, स्त्री तू स्त्री म्हणून श्रेष्ठ आहेस, स्त्री तू स्त्री म्हणून श्रेष्ठ आहेस. 

सर्व स्त्रियांना स्त्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..

-- जयंत जगताप
चेन्नई एअरपोर्ट 8.3.22 3.05AM

      14.          *हे विसरू नका*
लहानपणी घरातून बाहेर निघताना आई नेहमी सांगायची, सोबत घेतलेली छत्री विसरू नको, जेवणाचा डब्बा विसरू नको.. आता बायको कामांची यादी देते आणि निघताना म्हणते काहीच विसरू नका.. 
हे विसरू नका ते विसरू नका.. नक्की काय काय लक्षात ठेवायचे .. मग मला सुचले जीवनात आपण काय विसरले नाही पाहिजे.. ते मी इथे कवितेच्या माध्यमातून सादर करत आहे. 
कवितेचे शीर्षक आहे 
              *हे विसरू नका*
     नेहमीच सुखाच्या शोधत धावू नका. II 2 ||
नेहमी रस्ता चांगलाच असला पाहिजे हा अट्टाहास धरू नका..         
  हिरवेगार रस्ते, सावली देणारी झाडे,
 यात जमेल इतकं नक्कीच चला, पण....पण... 
तोच रस्ता आयुष्यभर असेल असं गृहीत धरू नका. २||
 चढ-उतार, खळगे, अवघड वळणे आणि घाट, 
            यात ही स्वतःला सिद्ध करा... 2||
कधी कधी रस्ता संपला अस वाटेल, तेव्हा..
स्वतः नवीन वाट तयार करण्याची संधी चुकवू नका.. २||
   भौतिक सुखाच्या मागे, आपला वेग इतका ही वाढवू नका की,
जेव्हा  माघारी फिरण्याची गरज पडेल तेव्हा वळता येणार नाही..
  रुक्ष, परिस्थितीने तापलेले, कठीण रस्ते ओलांडत,
     जेव्हा सुखाची विहीर सापडते तेव्हा. 2||
. तेव्हा भेटलेले आनंदाचे पाणी सर्वात जास्त गोड लागते,
                   हे विसरू नका.. 
  आणि हो सोबत अनुभवाचे गाठोडे असलेले, 
आपले जुने जाणते आपले सोबत आहेत.. ||2||
 तोपर्यंत... तोपर्यंत कोणतही संकट आपल्याला तोडू शकत नाही
हे विसरू नका..हे विसरू नका.. 
धन्यवाद.. 
  कवी जयंत जगताप
   7738022343
मु. पोस्ट कोपरखैरणे नवी मुंबई

   15.  *कोजागिरी पौर्णिमा*
दिवाळीची असते पहाट, गुडी पाडव्याच्या सकाळ, दसऱ्याची सायंकाळ आणि कोजागिरीची रात्र.. आहे ना कमाल.. आपले सण किती धमाल.. 
प्रत्येक वेळेला आहे महत्व... ||2||
कधी सूर्य, कधी चंद्र कधी झाडे फुले पूजून जाणतो आपण निसर्गाचे तत्व.. >>

कोजागिरी आहे अशीच खास पौर्णिमेची रात्र ||2||
देवी लक्ष्मी झाली प्रकट, म्हणून होई कौमुदी पौर्णिमा साजरी सर्वत्र..
कोण आहे जागे, कोण आहे जागे... अस विचारात सर्व आनंदात बाहेर फिरती II2II
मोकळ्या आकाशी, चंद्राच्या सफेद प्रकाशात सर्वजण अमृतमय दूध पिती. 
जो जो जागा त्याच्या घरी लक्ष्मी  करी निवास ||2||
आणि गोपाल कृष्ण गोपीकासंगे आजच्या रात्री खेळतात महारास.. 
चंद्र येई पृथ्वी भेटी..||2||.  सर्व भक्त अमृतप्रकाशी न्हाऊन निघती.. ||2||
पिके निघायची ही खरी सुरवात..  शेतकरी राजा आनंदून जाई चंद्राच्या प्रकाशात... ||2||

सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा.
*कवी जयंत जगताप*
मोबाईल नंबर 7738022343
ठिकाण कोपरखैरणे

   16  *सर्विस सेल्स अँड क्रिकेट*
यहा पे क्रिकेट और बिझनेस को एक दुसरे के साथ रिलेट किया है वो मैं आपको सुनाता हू. 
 टेस्ट मॅच 90 ओव्हर का होता है और हमारे क्वार्टर 90 दिन के होते है,  
फील्ड सर्विस टीम हमेशा 2nd बॅटिंग करती है,  क्योंकी वो हमेशा टार्गेट चेस करते है.. 

हमारे कस्टमर हमारे बॉलर्स होते है. 
उनकी गेंदे हमारे लिये enquiry होती है. उसे बॅट से हिट कराना मतलब PO में कन्व्हर्ट करना होता है.
बॉल को सीमा रेषा की बाहर भेजना मतलब रेव्हेन्यू होता हैं. 
हमारे फायनान्स, लीगल अँड ऑपरेशन टीम फील्ड के दो अंपायर होते है. जो हर बॉल को चेक कर के गुड बॉल है, या वाईड है ये डीसाइड करते है. 
बीच मैदान मे, PO checking, बुकिंग, मटेरियल अवेलबिल्टी, डॉक्युमेंट्शन, पेमेंट टर्म, ये सब फिल्डर होते है, 
 सबसे बेस्ट फिल्डर पेमेंट कलेक्शन होता है जो बॉन्ड्री पे खडा होता है, और कभी कभी रेव्हेन्यू के सिक्स को वापस अक्युरल और डिफरल के रूप में सीमारेषा के अंदर भेजता है. 
यहापे थर्ड एम्पायर के रूप में AR होता है जो कितने रन देने ये decide करता हैं. 
हमारे मॅनेजर और GM नॉन स्ट्रायकर एंड पे खडे बॅट्समेन होते है.
जो हमे कोणसा बॉल कैसे खेलना है, ये गाईड करते है. और कभी कभी स्ट्रायक पे आकर स्कोअर बढाने मे मदत करते है.
 हमारे डायरेक्टर हमारे कॅप्टन है जो हमे कब रफ्तार बढनी है ये बताते है. 
HR हमारी सिलेक्शन कमिटी होती है जो बेस्ट प्लेयर को चून कर लाती है और हर टीम को जीतने का मोका देती है.. 

और...90 दिन के बाद अगर पुरे रन नही बनते तो फॉलोवॉन के साथ अगला रन चेस फिर शुरू हो जाता है.  फिर शुरू होता है... 
Thank you.. 
Jayant jagtap











Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)