वृक्षारोपण
--------------------*वृक्षारोपण*-------------
गेल्या काही वर्षात पर्यावरण दिनचा वातावरण बघून मला प्रश्न पडला, आपण खरच वृक्षारोपण गंभीर पणे करतोय की फक्त एक उत्सव म्हणून साजरा करुन मोकळे होतोय.
त्यावर मला सुचलेली खालील कविता..
आपण पुन्हा एकदा झाडांना फसवतोयआपण पुन्हा एकदा वसुंधरेला फसवतोय...
झाडांची संख्या वाढवतो सांगून स्वतःचे फोटो वाढवले.
अर्धा फूट खड्यात प्लास्टिक मध्ये त्या झाडाच्या बाळाला ठेवून, फेकबुक वर छाती फुगवून मोकळे झाले.
वसुंधरे ला मी वाचवले या अविर्भावात झोपून गेले
दुसऱ्या दिवशी ते ताज पालविच पिल्लू कोणाचं तरी चारा झाले.
गेले कित्येक वर्षे हेच चालू आहे. फक्त खड्डे तयार होत आहेत, झाड तर तुटतच आहेत.
त्याच्या पासून बनवलेल्या पेपर वरच त्यांची संख्या वाढलीय फक्त. त्याच्या पासून बनलेल्या सोफ्या-खुर्चीवर बसूनच त्याला कस वाचवायच याची चर्चा झडतेय फक्त..
वसुंधरा तर अजून तापतच आहे. स्वतःची होणारी हानी बघून पुरातून रडतच आहे..
८खरतर 1 झाड लावा आणि त्याला दहा वर्षे जपा तर ते वृक्षारोपण आहे.* नुसतं जमिनीत लावून जगल तर जगल नाहीतर मेल. माझा सोशल acount वर तर like जगल.
गावाकडे तर वेगळाच प्रकार चालू आहे, जमीनीत पीक वाढावं म्हणून बांध वरची झाड तोडली जात आहेत. मग जमीन तापून ओसाड झाली की आपणच शहारासारखं गावाकडं पण गरम होतोय म्हणून ओरडत बसतोय.
आपण पुन्हा एकदा झाडांना फसवतोय
आपण पुन्हा एकदा वसुंधरेला फसवतोय...
जयंत जगताप...
Comments
Post a Comment