ग्रामदैवत काळ भैरवनाथ मंदिर
*ग्रामदैवत काळ भैरवनाथ मंदिर*
गाव म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते ते गावचे केंद्रस्थान. आणि आपल्या गावचे केंद्रस्थान आहे आपले ग्रामदैवत काळ भैरवनाथ मंदिर.
मंदिराच्या समोर लावलेल्या पायरीवर ह्या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला ते वर्षे कोरल आहे ते होत साल1940.
अतिशय मजबूत अस पाया आणि बसायची व्यवस्था असलेलं आपलं मंदिर वरील लाकडी फ्रेम मध्ये बांधलं होत.
हळू हळू ऊन वारा पाऊस यांच्याशी लढत उभे आहे.
आता त्याला पुन्हा एकदा नवा साज देऊन अजून मजबूत करायचा आशीर्वाद आणि जबाबदारी काळभैरवनाथाने आपल्यावर दिली आहे.
आपला गाव मोठा आहे. अनेक वेगवेगळे विचारांनी आपण सर्व गावचा विकास कसा साधायचा हे ठरवत असतो.
आता मंदिर कामासाठी सर्वांनी एकत्र येऊन हे कार्य करायचे आहे. यश देणारा आपला काळभैरवनाथ आहे आपण फक्त कर्म करायचे आहे.
काही शासकीय देणगी आली आहे. त्यासोबत आपण सर्वांनी आपला वाटा देऊन हे मंदिर सर्वांगसुंदर आणि मजबूत अस करूया.
यासाठी येत्या रविवारी 19 जून 2022 ला वाशी कांदा बटाटा मार्केट मध्ये सकाळी 11 वाजता मीटिंग आयोजीत केली आहे. तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विंनती.
गावावरून 25 ते 30 जण ग्रामस्थ येणार आहेत तरी दोन्ही मंडळ आणि पाचही भावकीतील सर्व ग्रामस्थ कृपया सर्वांनी उपस्थित राहून सर्वांनी विचारविनिमय करून हे जीर्णोद्धार पुर्णत्वास नेऊया
*बोला काळभैरवनाथच्या नावानं...चांगभलं...*
Comments
Post a Comment