टूथ पेस्ट


                टूथपेस्ट आणि मंदीवर मात

टूथ म्हणजे दात आणि दात घासायची बनवलेली ओली चिकट पावडर म्हणजे पेस्ट.  पेस्ट ला लागू होईल असा मराठी शब्द मला माहीत नाही. असो आपला विषय टूथपेस्ट आहे.
आपल्या जुन्या पिढ्याना कदाचित हा शब्द आणि हा प्रकार माहीत नसेल. ते आपले मस्त लिंबाच्या, बाभूळ, मिस्वक च्या काठ्या किंवा त्यांची पावडर मिठात मिसळून पावडर बोटावर घेऊन दात स्वछ करत असत.
हळूहळू दाताचा ब्रश (दात घासनी) येऊ लागल्या. लहानपणी ऐकचो की हे ब्रश घोड्याच्या केसांपासून बनवतात. तसच कोलगेट च्या पावडर आणि पेस्ट मध्ये हाडांची पावडर असते. खर-खोट माहीत नाही पण हे धाकले देऊन आपली जुनी पद्धत योग्य आहे हे मनाला पटायच.
जस जस जागतिकीकरण होत गेलं विविध प्रसाधने बाजारात येऊ लागली, विविध आकाराचे ब्रश, दातांच्या फटीत घुसणारे, हिरड्या साफ करणारे, नाजूक  हिरड्यांसाठी लहान मुलांचे मोठ्यांचे असे अनेक ब्रश आले. मग टूथपेस्ट पण कशी मागे राहील.
लहान मुलांची, मोठयनाची, दात दुखत असेल तर, मुखवास घालवण्यासाठी, सुगंधाची, प्रमाची सुद्धा असल्या टूथपेस्ट आल्या.
त्या जास्त खपव्या म्हणून कंपन्यांनी विविध क्लुप्त्या वापरल्या, त्यांचे तोंड मोठे केले म्हणजे नकळत जास्त वापरली जाईल. पण वापरणारे आपण त्यापेक्षा जास्त हुशार निघाले.
पेस्ट तर लागेल तेवढीच घ्यायची पण संपत आली तरी ती जास्त  कशी वापरण्याची युक्त्या शोधल्या. अगोदर बोटाने दाबून दाबून काढायची असे 5-6 दिवस झाले की लाटण्याने त्या पेस्ट च्या आवरणाला लाटून 2 दिवस पेस्ट काढायची. मग शेवटचा पर्याय त्या पेस्ट च्या मानेला कापायचे आणि अजून 2 दिवस वापरायचे.
तर सांगायचे मुद्दा हा की असे काटकसर करून प्रत्येक वस्तू चा पूर्ण उपयोग करणारे आम्ही भारतीय या आर्थिक मंदिला घबरात नसतो.
                                    + जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)