शौच भांडे प्रवास
*इंडियन की वेस्टर्न*
आपल्या प्रत्येकाला रोज ज्या गोष्टींची नितांत गरज असते त्यात शौचालय हे येते. जुन्या काळात कमी लोकसंख्या आणि मोठी मोकळी जागा यामुळे हा प्रश्न दुर्लक्षित होता. पण स्त्रियांना यासाठी रात्र होण्याची वाट पहावी लागत होती. हळू हळू लोकसंख्या वाढत गेली आणि उघडयावर सौच विधीमुळे अनेक आजाराच्या साथी येऊ लागल्या. हळू हळू शौचालय तयार होत होते. पण यात राजकीय क्रांती झाली ती 2014 नंतर. मोदी सरकार ने हर घर शौचालय ही योजना राबवून हा प्रश्न निकाली काढला. या अशा महिमेमुळे अनेक साथीचे रोग तर थांबलेच पण विचार करा कोरोनाकाळात जर उघडयवात शौच विधी करावा लागला असता तर गावेच्या गावे उध्वस्त झाली असती. त्यासाठी सरकारचे आभार. असो आपला विषय आहे शौचालय चे प्रकार. इंडियन आणि वेस्टर्न असे 2 प्रकार चे सौच भांडे असते. भारतात इंडियन पद्धत योग्य मानली जाते. आपल्या आहार शैली मुळे ती योग्य पण आहे. पण सध्या शहरीकरणामुळे बिल्डिंग तयार होत आहेत.त्यात बिल्डर वेस्टर्न पद्धतीचे शौचालय देतात. मग ते वापरून आपल्या लोकांना पोटाचे आजार होत आहेत. पण वयस्कर लोकांना गुडगे दुःखी मुळे वेस्टर्न शौचालय उपयुक्त ठरत आहे. आता प्रश्न पडतो कोणते ठेवायचे.
यावर उपाय म्हणून मला एक खास व्यवस्था दिसली. Jsw च्या भेटीदरम्यान त्यांच्या गेस्ट हाऊस मध्ये मला हा प्लास्टिक ची पाय ठेवायची व्यवस्था दिसली. ती नक्कीच आपल्यातील अनेकांना उपयुक्त ठरेल असे वाटले आणि हा लेख प्रपंच केला.
धन्यवाद
लेखक जयंत जगताप
7738022343
Comments
Post a Comment