BDO visit to mahu gaav

         *अभिनंदन ग्रामस्थ मंडळ महू* 
काल 24 सप्टेंबर ला महू गावामध्ये देशभरातील विविध राज्यातील BDO च्या टीम घनकचरा व्यवस्थापन कसे होते हे पाहण्यासाठी भेट दिली. त्याचे विडिओ आणि फोटो पाहून मन भरून आले. खरोखरच जबरदस्त अशी नैसर्गिक अशी संपत्ती लाभलेलं हे गाव आहे. मी देशभर विविध राज्यात फिरत असतो. असंख्य अशी गावे मी पहिली आहेत.काही प्रगत आहेत, काही मोठी आहेत  काही माळरानावर आहेत काही सपाट प्रदेशात आहेत. काही डोंगरावर असतात.  काहीना खूप जमीन आहे पण पाणी नाही, काही ना पाणीच पाणी आहे पण पिकाऊ जमीन नाही. 
आपलं गाव पाणी, जमीन, डोंगर, नदी, धरण या सर्व बाजूनी उजव आहे. लहानपणी जे नदीकडच गाव अस आपण चित्र काढतो ते आपलं गाव आहे. एक बाजूला डोंगर, दुसरीकडे नदी.गावाला वाडी,  गावातून जाणार बाविचा वडा, खूप अशा विहिरी. मधोमध असलेलं मंदिर आणि चारही दिशाना पसरलेलं गाव. गावच्या शिवेवर काळभैरवनाथच मंदिर. काळभैरवनाथ गावच रक्षण करत उभा आहे. 
मेहनती अशी गावातील जनता. सामाजिक सलोखा ठेवणारे ग्रामस्थ. यावर्षी तर गणपतीत अद्भुत असे खेळ घेतले गेले. महिला, लहान मूल मुली आणि वयस्कर लोकांसाठी मंदिराचा व्हरांडा म्हणजे हक्काचं ठिकाण. 
आशा सर्वांगीण विकास करणाऱ्या ग्रामस्थांचे करावे तेवढे कौतुक कमीच..

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)