गद्दार की खुद्दार

                     *गद्दार की खुद्दार*
गेले 3 महीने सर्वात जास्त वापरला गेलेला शब्द म्हणजे हा गद्दार.. जस टेनिस खेळताना टेनिस बॉल आणि बॅटमिंटन खेळताना कॉक नेट च्या अलिकडून पलीकडे आणि परत अलीकडे येत जात राहतो तसा हा गद्दार शब्द सध्या झाला आहे. दोन्ही कडचे खेळाडू संपूर्ण ताकद लावून दुसऱ्या बाजूला टाकत आहेत. पण कोणीच हार मानत नाहीये.  
पण या शब्दाकडे प्रत्येक जण वेगळ्या अर्थाने बघत आहे. 
एक आहे विचारांची बाजू आणि दुसरी आहे वारश्याची बाजू. वारसा जन्माने येतो आणि तो आला. विचार हे डोक्यात घुसळावे लागतात. महात्मा गांधी भारताचे आणि जगाचे बापू झाले ते त्यांच्या अहिंसाच्या विचारांमुळे, तत्वामुळे.  त्यांचे विचार आत्मसात करून मार्टिन ल्युथर किंग हा अमेरिकेचा गांधी झाला. त्याचा आणि गांधी रक्ताचा नाही तर विचारांचा संबध होता. गांधी चे मुले गांधी झालीत पण महात्मा नाही बनू शकलीत. 
छत्रपती संभाजी महाराज शिवपुत्र तर होतेच त्यांचेकडे वारसा पण होता आणि त्यांनी विचार ही स्वराज्याचे मोठे केले. त्यांची कारकीर्द ही ओळखली जाते ती त्यांच्या विजयी लढाया, स्वराज रक्षण आणि सर्वोच बलिदान मुळे.  
ते खुद्दार ही होते आणि विचारवंत ही होते. 
आज प्रश्न पडलाय जो विचारचा वारसा घेऊन पुढे जातो मग त्यासाठी वांशिक वारसा दूर करावा लागतो तो खुद्दार की गद्दार?  विचारामुळे पिढ्या घडतात. जर फक्त वांशिक वारश्यावर चालायचे तर ती परत राजेशाही होत जाईल. 
आज तोच टिकतो जो स्वतःच कर्तृत्व सिद्ध करतो. 
त्यामुळे जो वैचारिक वारसा घेऊन जातो तो खुद्दारच आणि जो विचारांशी प्रताडणा करतो तो गद्दार. जो ध्येय घेऊन चालतो तो खुद्दार. जो फक्त स्पर्धेत टिकण्यासाठी विचार सोडून विरोधी धारेत सामील होतो तो गद्दार. 

धन्यवाद
जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)