करहर चा आठवडा बाजार

करहर चा आठवडा बाजार
   पश्चिम महाराष्ट्र म्हणजे एकामागोमाग डोंगर रांगा आणि त्या रांगा मध्ये वसलेले छोटे छोटे खेडी, गावं, वस्त्या, वाड्या. दुर्गम आशा या भागात वसलेल्या या गावांना एकमेकांना जोडणारा दुवा म्हणजे बाजारच गाव. आठवड्यातील 1वार ठरलेला असतो. त्या वारी आठवडा बाजार भरतो. भागातील सर्व प्रकारचे व्यापारी, शेतकरी, चांभार, कुंभार, लोहार, बेलदार, असे बारा बलुतेदार या बाजारात येतात.
 जनावरे, कपडे, शेतीचे अवजारे, भाजीपाला, फळे, मिठाई, अस विविध प्रकारची दुकान या बाजारात असतात. 
दहावी ला असताना मराठीचा शेवटचा धडा होता तो म्हणजे लाल चिखल. एक शेतकरी त्याचा टोमॅटो चा खप होत नाही म्हणून शेवटी तो माल रस्त्यावर टाकून पायाने तुडवतो, त्यात त्याचा घाम, मेहनत, अश्रू, हतबलता डोळ्यासमोर उभी राहते. तो धडा वाचला की माझ्या डोळ्यासमोर उभा राहायचा तो करहर चा आठवडा बाजार. 
या गणपतीत पुन्हा तो बाजार अनुभवायाची संधी मिळाली. याचा 1 तरी विडिओ बनवायचा होता.  ती इच्छा या वेळी पूर्ण केली. 
नक्क्की बघा आणि कंमेंट मध्ये तुमचा आठवडा बाजार चे गाव कोणते ते सांगा. 
https://youtu.be/uaOO57BvoLc

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)