*श्री गणेश मित्र मंडळ*
--------------*श्री गणेश मित्र मंडळ*------------
गणपती उत्सव का व्हावा याची अनेक कारणे आहेत. अनेक नवीन मंडळ तयार होतात आणि काळा बरोबर लुप्त होतात. मंडळ रुजली आणि फुलली की ती असा काही करिष्मा करतात की त्यांना तोड नसते. साताऱ्यातील जावळीतीळ कुडाळ खोऱ्यातील महू गाव अफलातून आहेच पण या गावातील श्री गणेश मित्रमंडळ असे रुजलय की जस जून अवाढव्य वडाच झाड जस आपल्या पारंब्या जमिनीत रोवून डॊलत उभे असते. मंडळाचे कार्यकर्ते आशा पारंब्या आहेत की झाड दिवसेंदिवस मजबूत आणि बलाढ्य होत आहे. कार्यकर्ते नम्र आणि सर्वांना सामावून घेणारे आहेतच, त्यासोबत स्वाभिमान जपणारे आहेत. 40व्या वर्षाकडे वाटचाल करणारे मंडळ गावची शान आहे. मंडळ खूप जुने आहे पण रजिस्ट्रेशन झाले ते 1982 मध्ये. *संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत रामचंद्र गोळे* यांनी आणि सहकाऱ्यांनी मिळून स्थापन केलेले मंडळ हळू हळू गावची ओळख बनले. *मानसिंग जयसिंग गोळे, विठ्ठल दगडू गोळे, अशोक किसन गोळे, दिलीप सीताराम गोळे व आताचे विद्यमान अध्यक्ष भरत श्रीपती गोळे असे मात्तबर अध्यक्ष मंडळाला लाभले आहेत.* मंडळाची अनेक गोष्टीत हातखंडा आहेत पण सर्वात वर मानाचा तुरा कोणता असेल तर तो यांचे होणारे खेळ. लहान-मोठी मूल मुली ते सर्व महिला, अगदी म्हाताऱ्या बायका सुद्धा आपला ताण, थकवा, दिवसभर केलेलं काम विसरून इथे रमून जातात. मंडळाची जागा आहे ती गावातील मुख्य मंदिराच्या समोरील. खेळाचे तयार होणारे मैदान आणि प्रेक्षकांना बसायला होणारी व्यवस्था अप्रतिम आहे. त्यामुळे प्रत्येक जण आनंद घेतो सहभाग घेतो, आणि आनंद लुटतो.
जावळी भागत असे विविध स्पर्धा घेणारे मंडळ खूप असतील पण अस वातावरण आणि उत्साह असणारे गाव, कार्यकर्ते, प्रेक्षक आणि स्पर्धक इथेच भेटतील.
*श्रीगणेश मित्र मंडळाला मनाचा मुजरा.*
*गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया*
मीटिंग 9मार्च 2025
विषय:
1. फंड सुरू करणे आणि कोण चालवणार यावर चर्चा आणि निर्णय
2. शिवजयंती या वर्षीचे नियोजन आणि पुढील शिवजयंती कधी करावी यावर चर्चा.
3. मंडळाची वर्गणी न देणारे सभासद यावर चर्चा.
Comments
Post a Comment