महू माझे गाव
नमस्कार,
*माझे गाव महू गाव*
मी श्री. जयंत जगताप, गेले 28वर्ष नवी मुंबईत राहत आहे, नवी मुबईत माझं शिक्षण झालं आणि इथलाच मी स्थायिक झालो. मार्च मध्ये आलेल्या कोरोनाची साथ आणि संचारबंदी मुळे मार्च ते ऑगस्ट असे सलग 5 महिने गावी राहायला मिळाले आhणि गावाचा पूर्ण निरीक्षण करायची संधी मिळाली. ते इथे मांडत आहे.
मूळ गाव सातारा जिल्ह्यात जावली तालुक्यात कुडाळी नदीच्या किनाऱ्यावर आणि महाबळेश्वर पांचगणी डोंगर रांगांच्या पायथ्याशी वसले आहे. समुद्र सपाटी पासून 678 मीटर उंचीवर पश्चिम महाराष्ट्रात महू गाव आहे, गावची आजची लोकसंख्या लक्षात घेता गाव पाचशे ते सहाशे वर्ष पूर्वी वसले असावे वाटते. गावात मुख्य देवता काळभैरवनाथ आहे. या देवळाचा जीर्णोद्धार 1864 मध्ये झाला आहे अशी मंदिरावर नोंद आहे. या सोबत गावात, विठ्ठल रुख्मिणी, श्रीराम मंदिर आणि गावच्या वेशीवर बनातील काळभैरवनाथ मंदिर आहे. गावची लोकसंख्या 1200ते1500च्या आसपास आहे. तरीही करहर भागातील मोठ्या गावच्या यादीत गावचे नाव येते. गावात मुख्यतः गोळे आडनावाचे सर्वाधीक 80% लोकसंख्या आहे या सोबत जगताप, शिंदे, पवार, मस्कर, भगत, खुडे, कांबळे यांची लोकसंख्या 20% आहे. गावात 5 कुळे असून ती मोकाशी, पाटील, जागृती, प्रगती व नवलाई भावकी अशा नावाने ओळखली जातात. सर्व लोक या पाच भावकीत विखुरली गेली आहेत.
गावाचा वार्षिक सार्वजनिक उत्सव, देवाची यात्रा, दसरा, पालखी यात्रा, आर्थिक व्यहवार हे दरवर्षी एक भावकी कडे असतात. तसेच गावात 2 प्रमुख मंडळ कार्यरत आहेत, एक आहे श्रीगणेश मित्र मंडळ आणि दुसरे आहे श्रीबालगणेश क्रीडा मंडळ महू. गावातील सर्व तरुण या दोन मंडळात विखुरलेली आहेत. 1995च्या काळात गावात पार्टिशन होते त्यावेळस गावात अनेक वाद घडत होत असत हळू हळू ते कमी झाले आणि आता गाव एकरूप होत आहे परंतु जास्त लोकसंख्या असल्यामुळे थोडेफार वाद होतच असतात. ते अपवाद वगळता गाव गुण्यागोविंदाने वसला आहे.
गावात दळणवळणाची चांगली व्यवस्था आहे.
ग्रामीण भागात मुख्यतः पाण्याची तुटवडा असतो पण महू गावात, पिण्याचे पाणी चे स्वतंत्र व्यवस्था आहे आणि रोजच्या वापार्यांची पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. सर्व घरात नळाद्वारे पाणी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे गावची पाण्याची समस्या पूर्णपणे संपली आहे. तसेच गावात सरकारी योजना राबवून, रस्ते, वृक्ष लागवड, शेतीचे आधुनिकीकरण, गरीबना मोफत रेशन, बेरोजगारांना रोजगार अशा योजना राबविल्या जात आहेत.
गावात मुख्यतः देवळा पासून 4 रस्ते गेले आहेत या रस्त्याना खालची आळी, वरची आळी, पवळी आळी आणि मागची आळी आशा नावाने ओळखले जाते. गावात येणार मुख्य रस्ता मागच्या आळीने येतो आणि पवळी ला बाहेर निघतो. तसेच वरच्या आळीने आलेला रस्ता देवळा कडून खालच्या आळीने बाहेर पडायला देखील बनवला आहे. तसेच गावची एक वाडी देखील आहे. गाव 2 किलोमीटर मध्ये वसला आहे.गावच्या वेशी पूर्वेकडे पिंपळी, दक्षिणेकडे कुडाळी नदी, पश्चिमेकडे आखेगणी आणि वाहागाव, आणि उत्तरेकडे डोंगरमाथ्यवार खिंगर गावापर्यंत पसरल्या आहेत.
सध्या मागच्या आलीळा अनेक नवीन घरे तयार होत आहेत. गावच्या पूर्वेकडे गावतील मागासवर्गीय वस्ती आहे ती मांगवडा आणि महारवडा म्हणून ओळखला जातो. मांगवडा तुन एक रस्ता गावच्या डोंगराकडे जातो या रस्त्यावर एक खूप मोठा जुना वड आहे, त्याच्या पारंब्या देखील जमिनीत गेलेल्या आहेत त्यामुळे तो अतिशय मजबूत झाला आहे. हा वड 200 ते 250 वर्ष जुना असावा असं मला गावात वयस्कर लोकांशी बोलताना संशोधन करताना समजल. या वडाचे जतन करणे गरजेचे आहे.
गावाच्या पश्चिम-उत्तरेला धरण बांधले आहे आणि आता गाव हळू हळू प्रगतीकडे कूस बदलत आहे. गावातील 80 टक्के तरुण मुंबई पुण्याकडे रोजगार धंद्यासाठी स्थायिक झाले आहेत. त्यामुळे गावात वर्षभर कमी माणसे असतात त्यामुळे गावातील जिल्हापरिषद शाळा चा पट कमी आहे. आता गावातील मुले मुली देखील पांचगणी ला शाळेत जातात.
असे हे सर्व संपूर्ण महू गाव कोरणामध्ये देखील जोमाने लढत आहे आणि आपली प्रगतीची वाटचाल करत आहे. फक्त गावाला राजकारणाची कीड लागत आहे असं वाटत आहे, एखादयला लक्ष करून कधी कधी दंडीत केले जात आहे, काहीजण स्वतःला गावाच्या नियमाच्या वर समजत आहेत, गावचे नियम सर्वाना लागू होतात पण पाळणे सर्वांचे कर्तव्य आहे हे विसरणारे गावच्या एकात्मतेला तडा देत आहेत. गावचे मंदिर सर्वांचे आहे आणि सर्वांनी स्वखुशीने योगदान दिले पाहिजे, जुने दाखले देने बंद केले पाहिजे, तरुणांनी या राजकारणात न पडता स्वतःचा विकास साधला पाहिजे, काम धंदे केले पाहिजेत, कॉलेज च्या तरुणांनी मोबाइल गेम, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सएपच्या मधून बाहेर पडून कर्तुत्व करण्यावर भर दिला पाहिजे. काही पत्त्यावर दिवस दिवस वेळ घालवत आहेत, पत्त्या हे फक्त कधीतरी मनोरंजन म्हणून खेळला पाहिजे, काम सोडून इथे दिवस दिवस व्यर्थ घालवणे म्हणजे हे एक व्यसन आहे.
बाकी शेतकरी जबरदस्त काम करत आहेत, पाऊस आणि डुकरे त्रास देत आहेत पण तो लढत आहे.
या सर्व काळात अनेक जुने मित्र भेटले, सुजित बरोबर भरपूर गप्पा मारता आल्या, गणेश, शिवा यासारखे वयाने लहान पण हुशार मित्र भेटले, अवि, अमोल (पिंट्या) राजू, प्रवीण (टेके), श्रीधर, वैभव(बापू) यासारखे मित्र भेटले.
श्रीगणेश मित्र मंडळाचे कार्य पद्धती समजली, मेहनती असे अनेक तरुण यात कार्यरत आहेत जे निस्वार्थ भावनेनं गावासाठी काम करत आहेत. अमोल(गुरू) संदीप, भरत, संतोष जगताप हुशार सहकारी ओळखता आले आणि त्यांच्याशी सळोख्याचे नाते तयार झाले. गावातील युवा तरुण निलेश गोळे, विशाल गोळे आणि सहकारी शिवप्रतिष्ठान चे उत्कृष्ट कार्य करत आहेत.
निलेश जगताप, विनोद बाळू गोळे, जयवंत, अमित रांजणे, संतोष (वाळक्या) विंट्या यांसारखे झटणारे तरुण बघता आले.
यासोबत रोहिदास, बाबा, धर्मा, पिंट्या, यांसारखे त्यांच्या कामांत निपुन असे हे एक से बढकर एक कलाकार गावातील कोणतीही समस्या एकदम आरामात सोडवत आहेत.
यासोबत गावातील आशा स्वयंसेविका गावतील आरोग्याची काळजी घेत आहेत. तसेच महाराष्ट्रातील नावाजलेले हादवैदय श्री दिलीप दादा आणि त्यांचे बंधू व पुत्र त्यांच्या कार्यातून तरुणाना निरोगी राहण्यास प्रेरित करत आहेत.
कोणाचे नाव चुकले असल्यास क्षमस्व👏
आशा या सुजलाम सुफलाम गावचा अभिमान नेहमीच होता पण अवघड काळात सुरक्षित असे निवास गावामुळे मिळाला म्हणून हा अभिमान अजून द्विगुणित झाला आहे.
धन्यवाद
आपलाच गावकरी जयंत जगताप

Comments
Post a Comment