*परी चा आजोबा*

*परी चा आजोबा*
   मुलगी ला मुलगी म्हणजे नात झाली म्हणून आजोबा आजी भेटायला गेले. पाच दिवसांच नाजूक बाळ अजून ही नीट डोळे उघडत नव्हतं. अचानक बाळाच्या तोंडातून पाणी येऊ लागले आणि डोळे मिटून निपचित पडून होत. मुलीची सासर ची परिस्थिती हालाकीची, त्यात मुलगी झाली म्हणून नाराज. कोणी लक्ष देत नाही हे बघून आजोबाने बाळाला कुशीत घेतलं आणि दवाखान्याकडे धाव घेतली.  गाव मोहोळ तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात.
घरात गाडी नाही. रस्त्यावर येऊन गाडीची आशेनं वाट  बघत इकडे तिकडे बघत होता. इतक्यात एसटी आली. एसटी सोलापूर ची होती पण थांबे घेत जाणार होती. ड्राइवर ला परिस्थिती संगीतली. ड्राइवर ने जमेल तेवढी वेगात गाडी सोलापूर ला पोहचवली.
     2 दिवस दवाखान्यात ठेऊन डिस्चार्ज घेतला.  मुलीला डाउन सिंड्रोम आहे असं डॉक्टरानी सांगितलं. किती जगेल सांगता येणार नाही. सासर ची माणसांनी मुलगी अपंग आहे म्हणून नको म्हणून सांगितले.
आपल्या मुलीचा तिच्या मुलीसाठी तुटणारा जीव पाहून बाप हळहळला. 5 दिवसांचा तो मांसाचा तुकडा कुशीत घेऊन मुंबई घाटली. जे होईल ते प्रयत्न करून मुलीला जगवायच असा निश्चय केला. सोबतीला बायको आणि 2 तरुण मूल होतीच. आता आजोबा, आई आणि बाप झाला होता. 3 वर्ष फक्त पेज आणि दूध पाजून मुलीला हळू हळू मोठी करत होता. काही वर्षात मुलांची लग्न झाली आणि आलेल्या मामी ने देखील जीव लावून त्या बाळाला जीच नामकरण परी (बदलेल नाव) झालं तिला आपलंसं केलं. आज ती परी 9 वर्षाची झाली आहे. तीच मूळ घर आई वडील, याना कोनाला ती ओळखत नाही.
   14 फेब्रुवारी ला  स्कूल चालू झाले तिथे माझा ऑटिस्टिक मुलाला घेण्यासाठी उभा असताना तिचे आजोबा हे सर्व मला भरभरून सांगत होते. तसे ते एकदम धडधाकट आहेत.  इतक्यात समोरून एक रिक्षा आली. ती रिक्षा एक वयस्कर बाई चालवत होती. आजोबा मला बोलले आली आपली गाडी, मी म्हटलं या कोण " ही परी आजी" हे ऐकून मी आश्चर्य चकित झालो. म्हटलं तुम्हीं काय करता उत्तर आले घरात 3 रिक्षा आहेत, मी बायको आणि मोठा मुलगा रिक्षा  चालवतो. दुसरा मुलगा गॅरेज चालवतो. 2 सुना म्हणजे परीच्या मामी तिची काळजी घेतात. 
इतक्यात शाळेतून आवाज आला आणि मी निघालो. पण विचारात राहिले ते कार्तिकेचे आजोबा..
जिंकन आपल्या हातात नसत लढणं आपल्या हातात असत हे त्या 60 वर्षाच्या तरुणानं मला दाखवलं होत.
हा लेख त्या आजोबाला समर्पित.

     ---जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)