*स्त्री दिन शुभेच्छा*
स्त्री तू स्त्री म्हणून श्रेष्ठ आहेस
तू रांगडा उंच कातळ आहेस तर ती तुला पाझर फोडणारी नाजूक कळी आहे..तुझ्या आत दडलेले प्रेम बाहेर काढणारी ती सुंदर प्रेयसी आहे..
तुझ्या रांगड्या स्वभावाला आवरणारी ती प्रेमाची लगाम आहे..
तू कितीही उंच भरारी घेतलीस तरी तिच्या मनात खोल जागा करणं तुझं ध्येय आहे..
जिथे तू थकतोस तिथे तुझ्या पाठीवर हळुवार हात फिरवरून पुन्हा उभी करणारी जननी आहे.
असंख्य घाव होऊनही न फुटणारी तुझी छाती आहे तर ममतेने पाझरणारी ती जगाची माऊली आहे.
दोघांच वेगळपण आहे म्हणूनच एकमेकांच्या गरजेचे आहे.
एकसमान झालात तर चुंबकाच्या एकच ध्रुव बनून कायमचे एकमेकांपासून दूर जाल.
म्हणून पुरुष तू पुरुष म्हणून श्रेष्ठ आहेस, स्त्री तू स्त्री म्हणून श्रेष्ठ आहेस, स्त्री तू स्त्री म्हणून श्रेष्ठ आहेस.
सर्व स्त्रियांना स्त्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..
-- जयंत जगताप
चेन्नई एअरपोर्ट 8.3.22 3.05AM
Comments
Post a Comment