r f naik school 1st get together details

कार्यक्रम रूपरेषा
4 ते 8 27 फेब 2021
1. वर्गात जमायचे, वर्गात बसून गप्पा व फोटो सेशन.
घंटा वाजऊन खाली यायचे
2. सरस्वती पूजन, स्वागत समारंभ.
प्रार्थना वंदे मातरम
शिक्षकांचे स्वागत आणि पुष्पगुछ देऊन स्टेज वर बसवणे
3.स्टेज पाशी येऊन, प्रथम कोविड आणि वारलेलं सहकारी याना श्रद्धांजली,
4. वेलकम स्पीच
4. शिक्षकांचे सत्कार आणि सन्मान चिन्ह वाटप व शाळेचे गिफ्ट द्याचे. मग शिक्षक मार्गदर्शन थळे सर, सरिता पाटील मॅडम, कुरणे मॅडम, तिगडे मॅडम. आणि आठवणी ना उजाळा.
विध्यार्थी ओळख. विद्यार्थी ओळखीत प्रत्येकाला त्याची एक आठवण विचारायची,
ऐच्छिक एक शिक्षकांबद्दल आणि एक त्याच्या मित्र मैत्रिणी बद्दल.
6. गेम व ऍक्टिव्हिटी   straw and ball  and fuge  आणि होऊजी - by विशाल म्हात्रे.
राष्ट्रगीत जण गण मन
8. जेवण आणि समारोप

उजाळा आठवणींना
10 वि ची batch साल 2000
स्वागत सर्व शिक्षक आणि विद्यार्थी.
येथे जमलेल्या सर्व शिक्षक, कर्मचारी व सहकारी वर्ग व
सण 2000 दहावीच्या माझ्या सर्व  मित्रानो सर्वांचे खूप खूप स्वागत.
शाळेची सुरवात 1991 ते 2000 लहानपण एकत्र कसे गेले याचे वर्णन.
2000 ला आपली दहावी झाली आणि स्पर्धा शिक्षण चालू झाले. आपल्याला इंग्रजी 5वी पासून शिक्षणात आले आणि दहावी पर्यंत change the voice ची भीती घालवण्यात  आणि  degree affermative ते superlative कशी करायची हे समजण्यात गेली, पण ते इंग्रजी शिकलो त्याच्यावर पुढचे शिक्षण करण्यात कोणतंही अडचण आली नाही, थळे टीचर ने इंग्रजीचा श्रीगणेशा केला पारवे सरानी ग्रामर शिकवले  आणि पाटील टीचर ने  इंग्रजी निबंध कसे लिहायचे हे शिकवलं. हे शिकवलेलं इंगजीनेच पुढे आम्हाला स्पर्धेच्या युगात तारले. आम्ही जेव्हा पदवी घेऊन बाहेर पडलो तेव्हा 2005-2006 ला  IT चे युग सुरू झाले होते. त्यात आम्ही या शाळेतील ज्ञानावर मजल मारली.  ओवेळेकर, मेहतर सर, साठे मॅडम यांनी मराठी चे व्यंजने, क्रियापदे, कर्म शिकवले, कर्म करत राहा फळ नक्की मिळेल हे नकळत शिकलो आणि हे मोठे झाल्यावर समजले.
म्हात्रे सरांचे इतिहास, थळे सरांचे भूगोल आणि नागरिकशास्त्र आजही लक्षात आहे.  कुरणे आणि नलावडे टीचर चे विज्ञानचे प्रयोग वही लिहून घेतली आणि काचेच्या नळीत रसायन कसे धूर बाहेर फेकते ते धाकवले.  राऊत सर आणि क्षीरसागर मॅडम कडून हिंदी शिकलो.  ठाकूर टीचर चा भूगोल तास तर जगाची सफर घडवायचा, ते इग्लु घरे, ते मान्सून वारे, तो चेरापुंजी ला कसा सर्वाधिक पाऊस पडतो ते वाचून तर तिथे फक्त पाण्याचे तलाव असतील असे चित्र डोळयांसमोर उभे राहायचे.  ज्या विषयाची आतुरतेने वाट पाहायचो तो म्हणजे चित्रकला. चित्रकलेची पण कॉपी करून चित्र काढायचो आणि एकमेकांचे रंग घेऊन चित्र रंगवायचे. चित्रकलेला टेबल वर ठेवलेलं फुलदाणी, आणि वेगवेगळे शो पिस कधी समजले नाहीत पण आंबोरे सरांची पद्धत हटके होती ती सदैव लक्षात राहिली. पष्टे सरांचे PT चे तास आणि त्यांची अचानक मागे येऊन उभी राहायची कला आजही आम्हाला कोणाला अवगत करता आली नाही.
आठवीला असताना एक कविता बनवण्याची स्पर्धा होती त्यात मी माझी पहिली कविता बनवली होती. त्या कवितेला म्हात्रे सरांनी बक्षीस दिले होते आणि तिथून पुढे मी लेखन करू लागलो.
     


आपली batch वेगळीच होती कारण ती पहिलच होती एकविसाव्या शतकातली. 1991 ते 2000 मध्ये आपण सर्व या शाळेत शिकलो.  काही पाहिलीपासून, काही 4थी तर काही 8वीत असताना इथे आले. काहीजण दहावी अगोदरच दुसरीकडे गेले. पण आज असे सर्व निखळ मैत्री, निस्वार्थ, निरागस, मस्तीखोर, कसलाही लोभ नसलेली मैत्री बनली ती इथेच.  सण 2000 ला आपण 10वित आलो तेव्हा कॉम्पुटर चे नवीन च युग होते. एकविसाव्या शतकात  कॉम्पुटर बंद होणार हे आम्ही ऐकायचो, आमचा रुपेश भोईर कॉम्पुटर बद्दल काहीतरी वर्गात बडबड करायचा, Y2K problem yenar. पण आम्हाला त्याबद्दल ग चा म माहीत नव्हता, ना कधी compettive एक्साम दिली ना कधी मार्क्स चे टेन्शन. एकमेकांना वडिलांचे नावाने हाक मारून, कधी एकमेकांची टाय ओढून तर कधी कधी कोणाची ग्राहपाठची वही गायब करून. कोण गृहपाठ करायचे, कोण मार खायचे, कोण उगाच भाव खायचे, तर कोण कोण तर फक्त नजरेने प्रेम करायचे, असे आम्ही आनंदांत शाळेत घडलो आणि शिकलो.
  21व्या शतकातील पहिली 10वीची batch म्हणून आम्ही बाहेर पडलो.  शाळेत येताना भीती होती पण जाताना आत्मविश्वास घेऊन बाहेर पडलो.
शाळा संपली आणि सर्व आपापले रस्ते शोधायला बाहेर पडले, काही जण एकाच वाटेने जात होते, तर काही जण वेगळ्या वाटा धुंडाळत होते. कॉलेज ला सुरवात झाली नवीन मित्र, नवीन आकर्षण नवीन ठिकाण हे बघून मन दिपून गेले, त्या नवलाईत शाळेची आठवण, शाळेतील मित्र, ती धमाल, ती कमाल, ते सकाळचं वंदे मातरम आणि शाळा सुटताना जन-गण-मन म्हणून बाहेर पडायची घाई, PTच्या तासाची आतुरतेने पहायची वाट, स्पोर्ट्स days आले की अभ्यासला सुट्टी, स्काऊट गाईड ची तयारी, सर्व कुठे तरी मनाच्या कप्प्यात लपून गेले. हळू हळू सर्व विसरलोच होतो असे वाटत होते
अशी 10-11 वर्ष गेली.  सर्व जन आपापले शिक्षण संपवून नोकरीला लागले, काही आपले business settle करत होते, आता जस जस जीवनात set होऊ लागलो तशी तशी आता जुन्या आठवणी जाग्या होऊ लागल्या.  ती शाळा, ते मित्र, सर्व शिक्षक आठवू लागले. शाळा सोडली तेव्हा ना मोबाइल होता ना कोणाचा फेसबुक ना व्हॉट अँप. मग संपर्क कसा करणार?
2013 ला वॉटस अँप आले आणि शाळेचे मित्रांची शोधाशोध सुरू झाली. पुन्हा एकदा ते बालपण आठवू लागले, ती मस्ती पुन्हा अनुभवायला नाही, पण त्या जुन्या आठवायला तरी ते मित्र भेटतील का? म्हणून मन कासावीस होत होते, आणि अचानक एक दिवस R F Naik स्कूल 2000 च्या group मध्ये रुपेश ने ऍड केले. कोठून कसा नम्बर काढला देवाला माहीत पण पुन्हा जुने मित्र दिसले आणि मन आनंदाने उड्या मारू लागले.  पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या, मनाचा तो कप्पा परत त्या जुन्या आठवणी बाहेर काढू लागला आणि चेहऱयावर नकळत हास्य उमटू लागले, फक्त निस्वार्थ मैत्रीची पाखर पुन्हा एकदा एका झाडवर जमू लागलीत. पण इथे फक्त मुले जमलीत, मुली आपापल्या संसारात रमल्या होत्या. काही जणी इतर शहरात गेल्या असतील, त्यामुळे त्यांचा काही संपर्क नव्हता.
2020 मध्ये कोरोना आला आणि जग थांबवून गेला, या काळात अनेक वाईट बातम्या कानावर आल्या, कळत नकळत आपल्या शिक्षक आपले मित्र यांची काळजी वाटू लागली, थळे सरांचा तर मंदिरात पाया पडतानाचा विडिओ social मीडिया वर viral झाला आणि सर्व विध्यार्थी त्यांच्या साठी प्रार्थना करू लागले. ज्यांनी आम्हाला कणखर बनवले त्या सरांसाठी मन काळजी करु लागले, सरांच्या इच्छाशक्तीवर आणि विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेला यश आले आणि आमचे आदर्श सर पुन्हा एकदा नवीन पिढ्या घडवायला सज्ज झाले.  2020 असेच घरात आणि काळजीत गेले. कोरोना ने सांगितलं जीवन रेस्टार्ट करा, जस पूर्वी जगत होतात तस जगा, स्पर्धा करा पण जीवघेणी नको, आनंदात राहा, आणि अशी सुरवात करायला शाळेत जाऊनच श्रीगणेशा होऊ शकतो.  आज आपण परत एकदा आपली जिंदगी रेस्टार्ट करायला इथे जमलो आहोत. आनंद आणि आपली मैत्री हाच आपला खरा ठेवा आहे. आज करूया सुरवात जुन्या नव्या मैत्रीची.
  आपले हे स्नेहसम्मेलन ज्या आपल्या मित्रांमुळे यशस्वी झाले त्यांचे आभार मारल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही.
रुपेश म्हात्रे, सुरक्षा मढवी, देवेंद्र पाटील, अजय दोंदे, रुपेश भोईर, अतुल पारवे, सचिन राऊत, रुपाली चव्हाण,

जानेवारी 2021 उजाडले, लोकडोवन सैल झाले, आणि अचानक जानेवारी मध्ये रुपेश म्हात्रे ने गेट together करायची संकल्पना मांडली, कोणी नाही म्हणायचं प्रश्नच नव्हता प्रत्येक जण एकच विनंती करत होता, तारीख ठरवा, तारीख ठरवा.  सुरक्षा (पाटील) मढवी आणि रुपेश ने सुरवात केली आणि देवा, सचिन, अतुल, रुपेश, अजय यांनी शिलेदार बनून हे यशस्वी करायचा विडाच उचलला. त्यामुळेच आज आपण सर्व इथे जमलो.
.





                   कविता
             *आज उजाळा आठवणींना द्यायचा*
आलो इथे वडिलांचे बोट धरून, पण जाताना मन इथेच गेलो सोडून 
आज उजळा त्या आठवणींना द्यायचा.
शाळेत चढलेल्या पायरीला आणि बसून शिकलेल्या बेंचला.
आज बघायच आहे,  आहे का माझं नाव, अजून त्या करकटने कोरल्याला बेंचवर.
आठवायची आहे पोहचायची घाई, 7 च्या आत गेट वर,
आज उजळा त्या आठवणींना द्यायचा.
व्हरांड्यात उभे राहून प्रार्थना बोलण्याची वेगळीच मजा होती, उंची लहान होती पन आपल्या पुढे कोणीतरी आहे यातच खुशी होती. 
आज उजाळा त्या आठवणींना द्यायचा
पहिल्या तासाला गृहपाठ बघायला मॉनिटर यायची आणि नजर चुकवून एकच वही दोघेजण धाकवायचा
मराठी नंतर इंग्रजीचा तास यायचा आणि आमचा बत्ती गुल व्हायची.
आज उजळा त्या आठवणींना द्यायचा
गणितात खरी मजा यायची कारण आकडेमोड करायला लय सोपं वाटायचं. भूगोल शिकताना मन त्या प्रदेशात जायच आणि नागरिकशास्त्र आलं की परत वर्गात यायचं.
PTचा  तास  फक्त झाडांमध्ये खेळण्यात जायचा कारण  वर्गात अगोदरच होते खोखो चॅम्पियन संदेश आणि कब्बडीचा चॅम्पियन कैलास होता आम्ही फक्त पाण्याच्या बाटल्या संबळायला असायचो.
आज उजळा त्या आठवणींना द्यायचा.
परीक्षा असताना बाजूला मागच्या वर्गातील विध्यार्थी असायचा, मग कधी कधी आपला पेपर सोडून त्याचाच पेपर सोडवायचा.
कॉपी कधी केली नाही पण मागे पुढे धाकवून आणि बघून लिहल नाही असं कधी नाही व्हायच,
आज उजळा त्या आठवणींना द्यायचा.
सरांनी प्रश्न विचारला की पाहिले मागे बघायच, चुकून मागचा उठला तर आपण वाचलो म्हणत आपली मान खाली घालायची, तेव्हा जी मजा यायची ती परत आज आठवयाची
आज उजळा त्या आठवणींना द्यायचा.
                   -जयंत जगताप





           शाळा
शाळा म्हणजे शाश्वत लळा,  (शाश्वत मधला शा आणि लळा मधला ळा)
आयुष्यभर आठवत राहतात मैत्रिच्या गोड झळा.
आठवली शाळा की वाहतात आनंदअश्रू खळखळा,
शाळेत असताना घंटा वाजली की सर्व जण बोलायचे चला घरी पळा, पण आज दिसली शाळा की मन म्हणते अरे लेका... परत शाळेकडे वळा, परत शाळे कडे वळा
शाळा म्हणजे मित्रांचा शाश्वत लळा
                           -जयंत जगताप


*विशेष आभार*
रुपेश भोईर - मोहोल बनणार म्हणजे बनवणारच
सुरक्षा मढवी- जिने आपला कार्यक्रम सुरक्षित केला
देवेंद्र पाटील  देवेन is the secret of our energy
अजय दोंदे - गल्ली ते दिल्ली आपण ज्याच्या जीवावर उड्या मारू शकतो तो म्हणजे
रुपेश म्हात्रे - मास्टर माईंड ऑफ और गेट together
अतुल पारवे - एकदा मनावर घेतले की काम होणारच
सचिन राऊत - मूर्ती लहान पण कीर्ती महान असे ऍक्टिव्ह
रुपाली चव्हाण - स्पिरिट ऑफ और प्लांनिंग टीम.
गोरखनाथ भाईगडे- खजिनदार आणि सुपर पॉवर ऑफ ग्रुप
जयंत जगताप - सुत्रसंचालन  आणि कार्यक्रम ची रूपरेषा

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)