*रॉयल Royal (मोठेपण)*

     *रॉयल Royal (मोठेपण)*
हा फक्त शब्द नाही. हा दर्शवतो आपला स्वभाव, आपली जगण्याची पद्धत, आपली विचार शैली. तूम्ही कसले कपडे घालता या पेक्षा ते तुम्ही कसे घालता यात आपला अंदाज दिसतो. तस तुम्ही जे करता ते काय करता या पेक्षा कस करता यात दिसतो आपला रॉयल स्वभाव. रॉयल म्हणजे श्रीमंती नाही, रॉयल म्हणजे पैसे नाही. रॉयल म्हणजे मनाचा मोठेपणा, तुमचा जगण्याची पद्धत.  तुमच्या अंगी हा गुण स्वाभिवक असला पाहिजे. याचा आव आणणे आणि खरोखर रॉयल असणे यात फरक असती.  एखाद्याने आपल्या ला त्रास दयावा आणि वरून आपल्याला नावे ठेवून सुद्धा त्याला काहीही न बोलता विसरून जाणे हे मोठेपणाचे लक्षण असते.
काहीजण चिल्लर वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. रॉयल माणस आशा छोट्या गोष्टीत पडत नाहीत. माणूस जपणं, त्यासाठी झिजन त्या साठी निस्वार्थ पणे झटन याला रॉयल म्हणतात. अशी माणसं क्वचितच भेटतात. अशी माणसं टिकवता आली तरी आपण रॉयल बनतो.
Be a Royal....😊😊

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)