शाळेच्या आठवणी
*शाळेतील आठवणी*
1993 साली गावावरून तिसरी पर्यंत शाळा पूर्ण करून, वडिलांनी मुंबईला चौथी मध्ये ऍडमिशन घेतले. गावची 5 वर्गांची छोटी बैठी शाळा आणि समोर छोटे पटांगण होते. नवी मुंबईत कोपरखैरणे मध्ये 1993 च्या पावसाळ्यात भर पावसात वडील छत्रीत आम्हाला घेऊन कोपरखैरणे मधील नवीन इमारत बांधलेल्या शाळेत घेऊन गेले. भर पावसात डोळे दिपले. भव्य दिव्य अशी 3 मजली मोठी इमारत दिसली. हीच ती रामचंद्र फकिरजी नाईक शाळा म्हणजेच RF naik school. चौकोनी आकारात बांधलेली 50 by 50 meter जागेचा चौकोन, त्या मध्ये पटांगण आणि शाळेच्या बाहेर खूप मोठे खेळाचे मैदान. अगदी मनात भरून राहिलेली ही शाळा आहे.
4थी ला इथे प्रवेश घेतला ते 10 पर्यंत अविस्मरणीय अस शिक्षण इथे झालं. गावी बस्कर वरून आता बेंच वर बसायला आलो होतो. 8 पर्यंत सगळे एकमेकांचे ओळखीचे झालो होतो. पहिली चाचणी, सहामाही, 2री चाचणी मग वार्षिक आशा परीक्षा देत, एकमेकांना धाकवत आम्ही उत्तीर्ण होत होतो. माझे जोडीदार म्हणजे, यशवंत जाधव आणि विशाल घोटकर. मी मध्ये आणि मागे पुढे हे दोघे असायचे. विशाल ला फक्त उत्तरची सुरवात धकावली की तो पुढे लिहायचा. यशवंत ल शब्द न शब्द कॉपी करावा लागायचा. विशाल विज्ञानात हुशार तर यशवंत इंग्रजी मध्ये. गणित आणि भाषा आणि इतिहास विषय मी काढायचो.
अस एकमेकांना साथ देत सगळ्या जोड्या पुढे जात होत्या.
देवा ला पारवे, रुपेश भोईर ला विजय भोईर धकवायची की नाही हे त्यालाच माहीत, मुळीक-म्हात्रे, कैलास नाईक ला सांभाळायचे. अगदी 10 वी ला बोर्ड परीक्षेत माझी मुख्य उत्तर पत्रिका यशवंत ला द्यायचो. अस करत करत 10 वी झाली. आज ते मार्क लक्षात नाहीत पण त्यामुळे झालेली मैत्री अखंड राहिलीं आहे. अगदी चित्रकला सुद्धा एकमेकांचे बघून काढायचो. आम्ही फक्त पास होत पुढे जायचो टोपर यायचं काम मुलीकडे होत, त्यांना विजय भोईर स्पर्धा करायचा. ☺️☺️
मुलींमध्ये अस एकेमकाना धाकवत पेपर लिहिणं होत की नाही माहीत नाही.
काल 1 जुना 2रीतील फोटो ग्रुप मध्ये आला आणि या जुन्या आठवणी मनात जाग्या झाल्या.
Comments
Post a Comment