कर्म आणि फळ
कर्म आणि फळ
दुपारच्या लंच वेळेस ऑफिस मध्ये विविध देशातील खाद्यसंस्कृती वर चर्चा सुरू झाली. युरोप अमेरिका करत करत चीन, व्हिएतनाम, जपान, कोरिया इकडे पोहचलो..माझा व्हिएतनाम मधील अनुभव सांगितला.. बगळा कशा प्रकारे जिवंत भाजतात हे मी बघितले होते, त्याचे सर्व पिष्ट काढून त्याला अर्धमेला करतात आणि मग न कापता तसाच तंदुरी करायच्या जाळीवर टाकतात.. तडफडत तो बगळा मरतो आणि त्याची तंदुरी होते ती त्याच्या शरीरातील रक्तासोबत.. हे ऐकून सर्वजण शहराले.. एकजण पटकन बोलला त्यांना पाप लागत नाही का असे कर्म करतात..
मग चर्चा वळली कर्म आणि फळ याकडे.. जरुरी नाही की चांगले कर्म असेल तर फळ चांगले मिळेल. किंवा वाईट कर्मला फक्त वाईट मिळते.. अस असते तर आज चीन,कोरिया, व्हिएतनाम सारखे अमानुष हत्या करून जगणारे देश कर्माचे फळ भोगून नष्ट झाले असते. हे सर्व मानसिक आहे फक्त.. शेवटी आम्ही या तर्कावर पोहचलो की आपण कर्म करत राहायचे.. फळ काहीही मिळू शकते... जे योग्य आणि इतरना त्रासदायक नसेल आणि आपल्याला मानसिक शांती देईल ते कर्म करत रहा.. संकट.. येत रहातील.. तुम्ही हिमतीने लढत रहा.
Comments
Post a Comment