जीवनपट
++++++ *जीवनपट* ++++++
माणसाचे जीवन हे एका बी सारखे असते. जसे बी जमिनीत पेरले की त्याला ओलावा आणि योग्य खत पाणी भेटले की त्याचा अंकुर होता मग ते जमिनीतून बाहेर येते आणि उन वारा पाऊस झेलत मोठे होत जाते, जितका कठीण काळ तितके ते मजबूत होते किंवा काही रोप मुळासकट उन्मळून ही पाडतात.. जे मोठे होतात ती त्यांच्या गुणधर्मानुसार फळे, फुले, पीक देतात आणि त्यांचा कार्यकाळ संपवतात. माणसाचां सुद्धा एक कार्यकाळ असतो. त्या काळात त्याला त्याचे कर्म, कार्य, समाजसेवा, संसार, मित्र परिवार सांभाळून ईश्वरसेवा असे अनेक फळ द्यावी लागतात. त्यातून तो आनंद, समाधान, सुख, मानसिक समाधान मिळवतो.
आजच जीवन खूप धकाधकीचं झालं आहे. त्यात प्रत्येकजण काही ना काही व्यापात गुंतलेला आहे, ते आवश्यक ही आहे. त्यासोबत आवश्यक आहे आपल्या मित्रांच्या भेटीगाठी, आनंद आणि त्यातून समाधान मिळवणे.
आपले जीवन कार्य करत करत सोबतची माणसे, समाज, राष्ट्र समृध्द करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
यात माणूस यशस्वी झाला की जीवनपट यशस्वी होतोच होतो.
धन्यवाद
जयंत पांडुरंग जगताप
Comments
Post a Comment