बायकोस जर्मनी वरून पत्र
प्रिय बायको.. मनोरमा
from Germany,
हार न मानता लढणे हे काय असत, संकट कसे ही असो आपली तयारी पूर्ण करणे, एखद्याला एकदम स्पेशल फील करून देणे हे तुझ्याकडुन शिकावे.
वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत घेत तू जीवनाचे धडे सुद्धा शिकलीस. ताईघाट, आसगावं, घाटकोपर असा प्रवास करत जिथे जाशील तिथे सर्वोत्तम राहिलीस. स्वतचं कलागुण निरखत त्यात निपुण होत राहिलीस. अष्टपैलू अस तुझं व्यक्तिमत्व आहे. काही ठरवलं आणि तुला जमलं नाही असं नाही ये. खरंतर बायको म्हणून तू बेस्ट आहेस. पण जेव्हा मी तुला दुरून बघतो तेव्हा मला जस श्रीकृष्णाचे विराट रूप असते तस तुझ्यात आईच विराट रूप दिसत.. त्यासाठी मी कधीही तुझ्यासमोर नतमस्तक होतो. तुझा आदर माझ्या मनात खूप मोठा आहे. तुझी मेहनत, आपल्या लोकांसाठी झटण, एक परिपूर्ण अनुभव देणं हे अफलातून आहे. आराध्य साठी जी धडपड तू करत आहेस ती शब्दात उतरवू शकत नाही इतकी अफाट आहे... एक उत्तम गृहिणी, पाककला निपुण.. विविध
जर्मनी मध्ये बसून मला तुझ्यावर लिहायचं होत. पण काय लिहीन माहीत नव्हत. आज अचानक जे मनात साठून होत ते इथे उतरवतोय.
मला तू खूप खास आहेस.. मला तुला खूप आनंद द्यायचा आहे. आपण लाँग टूर करू, फिरू. हॉटेलिंग चांगल्या ठिकाणी करू कारण इकडे येऊन माझं मन थोड बदललंय. चांगली हॉटेल शोधून आपण चांगल खाऊ शकतो.. जे सुचत आहे, मनात येतेय ते तुझ्यासाठी आहे. ,😘😊.
Love u dear बायको. चल जेवतो
Comments
Post a Comment