लुथ लागणे

                     लुथ लागणे
   आज एक बोधकथा वाचली, शब्द जपून वापरा त्यामुळे कोणाची झालेली हानी भरून निघू शकत नाही. पण काही वाचाळ वीर कुठेही काहीही शब्दप्रयोग वापरून स्वतःला मोठं करण्याची पराकाष्ठा करतात. ते कोणाचं ऐकत नाहीत, फक्त दुसरयला ज्ञान देणार जस यांना सर्व माहीत असत. सर्वांनी यांच्या छत्राखाली राहायचं. यावरून मला खालील गोष्ट सुचली
 कुत्र्यांना एक आजार होतो, लुथ लागणे यात कुत्र्याच्या अंगावरील केस जातात मग ते पिसाळते, कोणालाही चावते, बाकीचे चांगली कुत्री याच्या जवळ येत नाहीत. पण त्या लुथ लागलेल्या कुत्र्याला वाटते त्याला सर्व घाबरत आहेत. ते जवळ गेले की माणसे दूर जातात. याला कोण खायला देत नाही मग ते गावाबाहेरील उकिरड्यावर जाऊन स्वतःचे खाते.त्याला तेच गोड लागते. त्याला कोणी उपचार करायला गेले तरी ते त्यांना चावायला बघते. मग याचा नाद सोडून देतात. ते मोकाट फिरत. ते तर बिचारा मुका प्राणी असतो. 

पण अशीच डोक्याला लुथ लागलेली माणसे एकटी पडतात, वायफळ बडबड,  कोणाला ही काहीही बोलणे, शब्दांचं भान नाही, स्वतःला श्रेष्ठ समजणे यामुळे यांपासून यांचे मित्र नातेवाईक दुरावतात पण त्यात पण ती स्वतःला ग्रेट समजतात. असेच कुठेतरी फुकट खायला प्यायला भेटल की त्यांची गुलामी करतात. स्वतः बदनाम असतात पण दुसरे चुकीची बदनामी करत आहेत असा आव आणतात. अशी लुथ लागलेली माणस खूप घातक. ती कधीच कोणाची होऊ शकत नाही. 
अशा माणसापासून दूर राहणे हेच योग्य.

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)