संभाजी भगत भेट
*अनपेक्षित ग्रेट भेट to शाहीर संभाजी भगत*
आज सकाळी सकाळी मुंबई एअरपोर्ट वर इंफाळ ला जाण्यासाठी पोहचलो. टॅक्सीतून उतरलो आणि सिक्युरिटी चेक करण्यासाठी चालत होतो तर पुढे चालणारी व्यक्ती ओळखीची वाटली. थोडेसे लांब कुरुळे केस, मजबूत शरीरयष्टी, half sleeves असलेला शर्ट आणि एका हातात बॅग. ८-१० पाऊले मी त्यांना फॉलो केले, अंदाज घेतला आणि आवाज दिला.. "तानाजी भगत.." पटकन ती व्यक्ती मागे वळली आणि हसत मला ओळख दिली. हो ते संभाजी भगतच होते. मी चुकून त्यांच्या बंधूचे नाव घेतले होते तानाजी. बाबासाहेब आंबेडकरांचे निस्सीम भक्त, शाहिरी करडा आवाज असलेले, अनेक प्रकारचे लिखाण केलेले, समाजात एक नवीन क्रांतीची ज्योत पेटवणारे शाहिरी जलसा करणारे शाहीर संभाजी भगत. त्यांनी माझा चेहरा ओळखला पण मी कोण आहे हे त्यांनी ओळखले नव्हते हे मी हेरले. "पांडुरंग जगताप यांचा मुलगा जयंत जगताप" हे सांगताच त्यांचा चेहरा अजून खुलला. आम्ही एका गावचे. वडिलांचे खास मित्र आणि सर्वात महत्वाचे त्यांचे वडील आणि माझ्या आजोबांचे खास घरचे संबंध होते. अवघड काळात त्यांच्या कुटुंबाला आमच्या घराचा चांगला आधार मिळाला होता हे ते अजून विसरले नाहीत.
थोड्या गप्पा करत करत एअरपोर्ट च्या गेलो आणि परत भेटायचे ठरवून निरोप घेतला.. आणि हो त्यांच्या सोबत एक ज्येष्ठ लेखिका कुसुम त्रिपाठी भेटल्या ज्यांनी आतापर्यंत १८ पुस्तके प्रकाशित केल्या आहेत.
अनपेक्षित ग्रेट भेट झाली त्याचा आनंद फोटोत दिसत आहे.
धन्यवाद
जयंत जगताप
Comments
Post a Comment