तेजस

भारताने स्वतचं पाहिलं फायटर जेट बनवलं तेव्हा त्याच नाव ठेवलं तेजस.. तेजस म्हणजे प्रकाशमय करणारा स्त्रोत.. 
*असाच महू गावाचा 30 वर्षाचा तरुण तडफदार तेजस* जो स्वहिमतीवर उभा राहत होता.. रस्ता अवघड होता पण कधी हार मानत नव्हता. तरुण शेतकरी म्हणून उदयास येत होता.. नोकरी करून बघितली पण मन रमले नाही तर स्वहिमतीवर व्यवसाय करत होता. पण नियतीच्या मनात वेगळेच होते..4 महिन्याची चिमुकली कळी, अवघड काळात सोबत उभी राहणारी पत्नी, प्रसंगी डोंगर ही हलवू शकतो अशी देहयष्टी देणारे आई वडील, जीवनाचा आधार असणारा भाऊ आणि स्वतचं काळीज समजणारी आज्जी, यांना मागे सोडून नियतीने त्याला आपल्यातून हरपून घेतले आहे. सर्वांच्या मनाला चटका लाऊन जाणारा हा तेजस च मृत्यु. आज तो अनंतात विलीन झाला. 
देव त्याच्या आत्म्यास शांती देवो आणि परिवारास सावरण्याच बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)