माझे सामाजिक कार्य
माझे सामाजिक कार्य
लहानपणापासूनच कोणत्या ना कोणत्या प्रकारे सामाजिक कार्य करायची आवड लागली आणि यातून आमचा एक ग्रुप तयार झाला. त्यातून अनेक रक्तदान शिबीर आयोजित केलीत आणि मी नियमित रकतदाता झालो. हळू हळू ग्रुप चे मंडळ तयार झाले आणि कोपरखैरणे सेक्टर 4 मध्ये शिवसाई मित्र मंडळ नावारूपास आले. मंडळाच्या माध्यमातून अनेक धार्मिक, सांस्कृतिक, क्षेशनिक उपक्रम राबवत आहोत.
या सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशासनाशी योग्यरीत्या पाठपुरावा करत एका अधिकृत जागेवर गणपतीचे प्रशस्त असे मंदिर बांधले जे आज वरद विनायक मंदिर म्हणून नावारूपास आले आहे.
या मंदिरात तबला शिकवणे, स्वामींची बैठक, धार्मिक शिक्षण शिबिरे होतात, मंदिरासमोर प्रशस्त अशी जगा आहे तिथे कराटे क्लासेस होतात, तसेच छत्रपती संभाजी राजे बलिदान मास या ठिकाणी पार पाडले जाते.
एका नवीन परिसरामध्ये प्रशासनासोबत लढा देऊन आम्ही सर्वांनी हे मंदिर उभे केले आणि त्यात मी वैचारिक आणि भौतिक असा दोन्ही प्रकारे वाटा उचलला याचा आज मला अभिमान वाटत आहे. आज मंदिर कामकाज दुसरी पिढी यशस्वीरीत्या सांभाळत आहे.
यावर्षी मंदिर जीर्णोद्धार केलेला त्यास 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या आठवणी जाग्या झाल्या.
आपल्या जीवनप्रवास मध्ये आपण अस काहीतरी केलं आहे ज्यामुळे समाजाला त्याचा फायदा होत आहे हे बघून नक्कीच थोडा अभिमान वाटतो.
गणपती बाप्पा मोरया
Comments
Post a Comment