गोष्ट फेसबुक, व्हॉट्स ॲप आणि इंस्टा बरोबर ओळखीची

       *गोष्ट  फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टा बरोबर ओळखीची*
दिवाळी निमित्त माझे खास लेख
  गोष्ट पहिली-: फेसबुकशी ओळख 
 काळ 2007 चा होता. इंजिनीअरिंग चे शेवटचे वर्ष, शेवटची सेमीस्टर (सेम) चालू होती. आता कॉलेज मधून बाहेर पडून बाहेरचे जग बघायचं. अजूनही कीपॅडचा मोबाईल वरच सर्व चालू होते. (2009 मध्ये touchscreen चे खरे मार्केट आले.) इंटरनेट वापरायचे म्हणजे सायबर कॅफे शोधून तिथे नंबर लावायचा आणि 20 रुपयात 1 तास किंवा 10 रुपयात 15 मिनिट अस बसून गूगल सर्च करायचे. 
तेव्हा एकदा वर्गात आमच्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या HOD  नी पाटील सरांनी आम्हाला इंटरनेट वर फेसबुक अस काहीतरी नवीन पोर्टल आल आहे ते बघा, कॉलेज संपल्यानंतर पण एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ते तुम्हाला कमी येईल असे सांगितलं. आम्ही त्या वेबसाईट च address लिहून घेतला आणि संध्याकाळी जाऊन खूप मेहनत करत, हळूहळू चालणाऱ्या इंटरनेट वर फेसबुक वर अकाउंट तयार केले. मग 6 महिने काय त्याकडे बघितले नाही. त्याकाळात स्मार्ट फोन नव्हते त्यामुळे स्वतःचा फोटो प्रोफाइल वर ठेवणे खूप कठीण काम असायचे. कॉलेज मध्ये असताना  gladiator सिनेमा पाहिला होता त्या मधील maximus आवडता हिरो होता. मग गूगल वर शोधून त्याचा फोटो माझ्या अकाउंट वर प्रोफाइल म्हणून ठेवला होता. अशाप्रकारे फेसबुकशी ओळख झाली. फेसबुक मुळे अनेक नवीन मित्र भेटले, लिखाण करायला नवीन प्लॅटफॉर्म भेटला. नवीन माहिती, लेख वाचायला भेटले. 2014 आणि 2019 ची लोकसभा निवडणूक फेसबुक मुळे गाजली, आणि कोविड काळात तर फेसबुक लाईव्ह मुळे जनतेला मार्गदर्शन करायला खूप मदत झाली. 

गोष्ट दुसरी :- व्हॉट्स ॲप 
मला माहित आहे त्यानुसार 2011 मध्ये भारतात व्हॉट्सअँप आले. नुकताच स्मार्ट फोनचा जमाना सुरू झाला होता, ब्लॅकबेरीला samsung, Motorola टक्कर देत होते. नोकिया आउटडेटेड होत होता. 
आता इंटरनेट देखील चांगले जोमात आले होते. गूगल, यूट्यूब व्हिडिओ चांगले जोरात मार्केट पकडत होते. त्याकाळात चाट करायला, म्हणजे बोलायला चाट म्हणजे हिंदी मध्ये मसाला असतो आणि मराठी मध्ये चाटणे असते आणि इंग्लिश मध्ये एकमेकांशी मेसेज करून बोलणे म्हणजे चाट असते. असो... 
चॅटिंग ॲप नव्हते, हे हेरून अमेरिकन कंपनी ने व्हॉट्सअप नावाचे चॅटिंग ॲप लाँच केले. अगोदर हे कसे चालते हे माहीत नव्हत, तस् त्याकाळात अशा नवीन गोष्टी खूप विचार करून सुरू केल्या जायच्या. मला आठवतंय एकदा सकाळी सकाळी 6 वाजता बायकोला ऑफीस बस पर्यंत सोडायला जात होत आणि तेव्हा ती या नवीन ॲप विषयी सांगत होती. मला वाटले हे सुध्दा फेसबुक सारख्या असेल, मी आपलं सहज म्हटले माझं पण खोल अकाउंट. तेव्हा तिच्याकडून समजलं हे फोन नंबर linked असते आणि आपल्या मोबाईल मध्ये फक्त आपलेच अकाउंट चालते. मग तीच्यकडून लिंक घेऊन व्हॉट्स ॲप डाऊनलोड केले. तेव्हा हे स्टेटस वैगरे काही नव्हत. मला आठवतं तेव्हा ग्रुपची सभासद संख्या जास्तीत जास्त 56 होती. त्यावर मी व्हॉट्स ॲप ला मेल करून विनंती केली होती की सभासद संख्या वाढवा. कालतराने ती 256 झाली. कदाचित त्यात माझ्या विनंतीचा ही सहभाग असेल. 
व्हॉट्स अपने जितके जग जवळ आणले तितकीच भांडणे लावलीत. माहितीची देवाणघेवाण सोपी झाली बिझनेस सोपे झाले, तितकाच धोका वाढला.. 
चर्चा घडत घडत कधी एकतर्फी विचार मांडायला सुरवात होते आणि त्यातून वाद निर्माण होऊ लागले. जे समंजस आहेत त्यांनी व्हॉट्सॲप चा चांगला उपयोग केला, काहींनी प्रेम प्रकरणे करायला वापरले, काहींनी धमकाव्याला वापरले, काहींनी कुटुंब एक करायला वापरले, काहींनी गाव, तालुके, जिल्हे, शहरे एक प्लॅटफॉर्म वर आणलीत. अनेकांनी यावर आपले बिझनेस सेट केले. कोविड काळात रेमेडीसिवर इंजेक्शन असो की कोणत्या हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध आहेत किंवा कोणाला कोणती मदत हवी असेल तर व्हॉट्स ॲप ग्रुप मुळे खूप फायदा झाला. 
अस व्हॉट्स ॲप सुरळीत सुरू असताना स्टेटस चे फिचर आले आणि सर्वांमध्ये जणू आपली वयक्तिक मत जगाला धाकवण्याची हक्काची जागा भेटली. यावर कोणाला टोमणे मारणे ते अगदी कोणाचे स्टेटस बघून मीटिंगमध्ये विषय घायची कोणावर वेळ आली. शेवटी स्टेटस हे वयक्तिक मत आहे, आणि कोणावर जबरदस्ती नाही की जाऊन बघावे तरी अनेक जण इतरांचे स्टेटस बघायला आतुर असतात. आजकाल फोन न करता फक्त स्टेटस बघून सर्व माहिती मिळते. 
अस हे व्हॉट्स app सध्या सोशल मीडिया वर राज्य करत आहे.. 
तिसरी गोष्ट -- इन्स्टाग्राम ची..
नवीन घेतलेल्या फोन मध्ये हे ॲप डिफॉल्ट होते आले होते आणि ते मी डिलीट केले होते. हळू हळू फेसबुक चे युजर इन्स्टा कडे वळू लागले तेव्हा समजले इथे छोटे छोटे व्हिडिओ मधून मोठा संदेश देत आहेत आणि अनेकजण यातून पैसे कमवत आहेत. तरीही मला याचा ओढा नव्हता. नंतर नंतर इंस्ता वरील रील बायको व्हॉट्स ॲप वर पाठवू लागली आणि त्या बघायच्या म्हणून insta download केले. हळू हळू मीही त्यात रुळलो आणि आता स्वतःचे रिल बनवू लागलो. लहानपणी क्रिकेट मॅच बघत बसायचो तेव्हा वडील म्हणायचे नुसत बघू नका खेळा आणि त्यात पारंगत व्हा मग बघायला अजून मज्जा येईल.. तसच माझं insta वर झालं आहे. नुसता बघत राहण्या पेक्षा स्वतः बनवा आणि मग बघा जास्त मज्जा येईल याचा अनुभव आता येतोय.  अजून इन्स्ता वर मी नवीन आहे पण जम बसावतोय.. पण insta हे वेळ खाणारे ॲप आहे अस मला वाटत एकदा त्यात गेले की खूप वेळ रीळ बघण्यात आपण मग्न होतो आणि शेवटी बाहेर यायला खूप अवघड जाते. 

अशाप्रकारे माझी या तिन्ही ॲप बरोबर ओळख झाली.. आपली कशी झाली याची काही आठवण असेल तर नक्की लिहून कळवा. 
धन्यवाद 
*लेखक जयंत जगताप*
7738022343


Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)