खाप पंचायत

      खाप पंचायत/ ग्राम सभा/ सामुहिक ग्राम सभा

इसवी सन पूर्व 600 वर्षापासून अस्तित्वात असलेली ही परंपरा आहे. आजही ती हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब या उत्तरेकडील राज्यात खूप प्रबळ व्यवस्था आहे. 
खाप म्हणजे गाव गावाने  मिळून तयार केलेली न्यायव्यवस्था प्रणाली. 7 गावे मिळून एक थांबा बनते. अशा 12 थांबाची  म्हणजेच 84 गावांची मिळून एक सर्व-खाप तयार होते. खाप मधे 3 प्रकार असतात. 
1. एक जातीतील एकच गोत्र असलेले किंवा 
2. एक जात अनेक गोत्र असलेले किंवा 
3. अनेक जाती आणि अनेक गोत्र असलेले असे मिळून बनलेली खाप. 
यात प्रतिष्ठित किंवा स्वतःला सामाजिक क्षेत्रात सिद्ध केलेली व्यक्तींची पंच म्हणून नियुक्ती होत असते. समाजातील अनेक प्रश्न जे न्यायालय प्रक्रियेमध्ये अनेक वर्ष अडकून पडू शकतात ते इथे काही दंड ठोठावून सोडवले जातात.  जरी ही व्यवस्था संविधानिक नसली तरी पूर्वीपासून चालत आली आहे आणि लोकांच्या विश्वासावर टिकून आहे. यात काही चुकीचे निर्णय ही दिले जातात. ही पंचायत पुरुषसत्ताक आहे त्यामुळे जुन्या परंपरा आणि रूढी मोडणाऱ्या स्त्रियांसाठी इथले निर्णय कधी कधी अन्यायकारक ठरतात. तरी अनेक सामाजिक आणि व्यक्तिक तंटे इथे कमी वेळात आणि कमी खर्चात सुटले जातात त्यामुळे अजूनही ही पंचायत आपले अस्तित्व आणि लोकप्रियता टिकवून आहे. 
ही झाली उत्तरेकडील खाप पंचायत बद्दल माहिती. 
अशाच काही गावांच्या मिळून बनलेल्या पंचायती महाराष्ट्र मध्ये देखील आहेत पण त्या खूप कमी आहेत. अनेक गावांच्या स्वतःच्या वार्षिक लेखाजोगा मांडायच्या सभा होतात त्यांना पाकळणीं असे म्हटले जाते. 

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात देखील या खाप पंचायत प्रमाणे एक सहागाव पंचायत भरते. हातगेघर, कावडी, विवर, पानस, अखेगणी आणि सायघर अशी ही एक खोऱ्यात वसलेली गावे. 2 गावे डोंगराच्या पायथ्याशी, 2 डोंगराच्या मधोमध आणि 2,  आणि 2 डोंगराच्या माथ्यावर वसलेली गावे. पण यांनी ही परंपरा खूप चांगल्याप्रकारे जपून ठेवली आहे. वार्षिक एकदा सहागाव पंचायत बसते. त्यात व्ययक्तिक भांडणतंटे, विकासाची कामे, वार्षिक अहवाल, देवाची पालखी, मिरवणूक, वार्षिक सण उत्सव नियोजन, सामाजिक कार्ये आणि अनेक येणारे विषय इथे हाताळले जातात. प्रत्येकवर्षी एक गाव या प्रकारेया पंचायतीचे सभेचे ठिकाण असते. सहा गावातील काही प्रतिष्ठित मंडळी पंच म्हणून निवडले जातात. ते देतील तो निर्णय आणि न्यायदान सहा गावांना मंजूर असतो. अशा व्यवस्था सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. आणि गरीब जनतेला न्यायासाठी महत्वाच्या असतात. 
हे झाले सामूहिक पंचायतीची माहिती. 

अनेक गावात फक्त त्या गावच्या वार्षिक सभा होतात त्यांना देवाची पाकळणी असे म्हटले जाते.  या सभा मध्ये ठरलेलं पंच नसतात हे यातील कच्चे दुवे आहेत, कारण त्यामुळे न्यायदान कोणी करावे हे ठरलेले नसते आणि ऐनवेळी कोणीही पुढाकार घेतला नाही की मग त्याचा परिणाम निर्णयावर होतो. तसेच इथे झालेलं सर्व विषय आणि निर्णय लिहून ठेवणे गरजेचे आहे. काही गावात हे केले जाते. त्यामुळे एकच विषय परत परत घेतला जाऊन गावच्या लोकांचा वेळ  निरीक्षण केलेले 
पण यात काही तोटेही असतात. कधी कधी काही धनदांडगे इथे अरेरावी करतात, स्वतःची प्रतिष्ठा वाढावी म्हणून किंवा स्वतःला मोठे म्हणवून घेण्यासाठी व्यवस्थेत बाधा आणतात. काहीही योगदान न देता फक्त एक नागरिक या नात्याने अधिकाराचे गैरवापर करतात आणि सामान्य जनतेला वेठीस धरतात. अशा सभेत झालेले निर्णय हे सर्वांनी स्वीकारलेले असतात परंतू काही ताकतवर मंडळी या निर्णयांना वेगळ्या पद्धतीने आव्हान देऊन सामान्य जनतेच्या विश्वासाला तडा देतात. 
परंतू जुने जाणते मुरलेले पंच अशा परिस्थितीत सुद्धा संयम ठेऊन योग्य असा न्याय निपटारा करत असतात..
सर्वच निकाल सर्वांना पटतील असे नसते पण ही सभा म्हणजेच पाकळणी म्हणजेच ग्रामसभा ही देवाची असते आणि सर्वांनी तिचा आदर आणि सन्मान केला पाहिजे हे महत्वाचे. तरच अशा सामाजिक व्यवस्था टिकतील.. अशा ठिकाणी झालेले निर्णय, जरी आपल्या मनासारखे नसतील तरी स्वीकारले पाहिजेत तरच ही सर्वांनी सर्वांसाठी बनवलेली व्यवस्था विश्वासपात्र ठरेल आणि टिकून राहील आणि अजून मजबूत होईल..
यासाठी मला सुचलेले काही सुधारणा
1.सर्व विषय आणि निकाल लिहून ठेवणे गरजेचे आहे. 
2. सभेचे पंच ठरवणे आणि त्यांचे निकाल अंतिम असतील हे सर्वांनी मान्य करणे. 
3. सभेनंतर कोणीही पंचांना व्यक्तिगत दोषी न ठरवणे. 
4. सभेत आपल्या व्यक्तीक शक्तीचे प्रदर्शन करू नये. ग्रामसभेत सर्वजण समान असतात आणि सर्वांना समान न्याय लागू झाला पाहिजे. 
कृपया हा लेख माहिती म्हणून वाचवा.
धन्यवाद
जयंत जगताप



Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)