सुट्टीतील दिवस

              बघ तुला.बरे वाटेल.. 
इंजिनियरिंगच्या चौथ्या सेमिस्टर ची परीक्षा देऊन भाचा, गेले 1 महिना त्याच्या मित्रासोबत काही डिजिटल प्रोजेक्टवर काम करत होता. अगोदरच कॉलेज मध्ये कॉम्प्युटर, पुस्तक वाचून,  डिजिटल प्रोजेक्ट करणारी ही पोर सुट्टीत पण अशी कॉम्प्युटर आणि मोबाईल वर पडून आहेत हे बघून मनाला चलबिचल झालं.. 
   परवा अशाच त्याच्या पार्ट टाइम प्रोजेक्ट विषयी माहिती विचारत होतो आणि तो भरभरून सांगत होता. पण मला मनात कुठेतरी ते आवडत नव्हते. मला आमचे दिवस डोळ्यासमोर आठवत होते. खूप वेळ त्याच ऐकत ऐकत मी माझ्या कॉलेजच्या सुट्टींच्या दिवसात गेलो.. आणि भाच्याला आठवणी सांगत सांगत खालील कविता तयार झाली.
संध्याकाळी 4 वाजता असच भटकत बाहेर पड..
 सोबत मोबाईल नको घेऊस..
खेळाच्या मैदानात जा..
3-4  संघ क्रिकेट खेळत असतील. सर्वांचे निरीक्षण कर.. एखादा 2व3 मुलांचा ग्रुप असेल. त्यांना क्षेत्ररक्षण करायला प्लेअर कमी असतील. त्यातील सिनिअर खेळाडू ओळख.. त्याला भेट, "मी खेळू का तुमच्यात" म्हणून विचार... 
तो विचारेल "काय येत तुला" तू बोल "देशील ते करीन" मग तो तुला खेळ बोलेल,  आणि जिथे प्लेअर नसेल अशा कोपऱ्यात उभ राहायला सांगेल.. 
फिल्डिंग करत रहा.. अचानक एखादा बॉल तुझ्याकडे येईल.. मन लाऊन फील्डिंग कर.. बॉलच्या मागे धाव.. तू पकडशील आणि टाकशील तेव्हा बघ तुला बर.. वाटेल..

 काहीतरी नवीन केल्याच्या भास होईल.. मग खूप वेळाने तुला बॉलिंग करायला बोलवतील.. बॉलिंग कर.. आधी तुझा क्लास दाखव.. ते इंप्रेस होतील.. मग थोड ढील दे.. ते पण खुश होतील.. मैत्रीच दुसर पाऊल इथेच पडेल. पहिल.. पहिल...त्यांनी खेळायला घेतलं तेव्हाच पडलेलं असत.. 
मग बॅटिंग कर.. थोडे बॉल असेच टोलव.. बघ तुझा आत्मविश्वास दुणावेलं.. मोठा फटका खेळून बाद होशील.. पण संघात सेट होशील.. 
घरी येतना नवीन मित्रांची नावे पाठ करशील.. आणि उद्या पुन्हा मैदानावर जाण्याची ओढ घेऊन घरी.येशील.. 
बघ तुला बरे वाटेल... बघ तुला बरे वाटेल...

जयंत जगताप.. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)