कै. भिकू तुकाराम जगताप (अण्णा)

कै. भिकू तुकाराम जगताप (अण्णा) म्हणजे घरातील सर्वात मोठे व्यक्ती.. सहा बहीण भावांचा षट्कोन होता. यातील मोठा कोण म्हणजे अण्णा.. 
अण्णांचा जीवनप्रवास एक रोमहर्षक आणि प्रेरित करणारा असा आहे. मला आठवतं लहान असताना घरात काही फोटो असायचे त्यात अण्णांचे कतार मधील काही फोटो होते. एकदम पॉश मध्ये एका मोठा सोफ्यावर टेकून बसलेले अण्णा आठवतात. परदेशात जाऊन आलेले आपल्या घरातील पाहिले व्यक्ती म्हणजे अण्णा. 
तिकडून येऊन पण इथे फक्त शेती मध्ये न रमता मार्केट मध्ये वयाच्या 45 व्या वर्षी कामाला लागले अन मेहनतीचे काम केले. निवृत्त होऊन समर्थ पणे गेले 20 वर्ष शेती देखील केली. शेवटपर्यंत सतत कार्यरत राहून त्यांनी सर्वांना एक वेगळा आदर्श दिला आहे. अण्णा-भाऊ - बापू सोबत आप्पा आणि नाना यांच्यात एक वेगळीच एकी आम्हाला बघायाल भेटायची.जगताप घर एक ठेवणे, घराची प्रतिष्ठा टिकवणे आणि वाढवणे याचे काम सर्व करत आहेत आणि यात अण्णा समंजस स्वभावाने नेतृत्व करायचे. सर्व नातेवाईकांमध्ये अण्णांना एक वेगळा मान होता आणि आहे. असे अण्णा आज आमच्यात नाहीत हे जाणवून मनाला चटका लागून जातो. 
अण्णा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली..

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)