रक्त पिसासू

                   *रक्तपिसासू* 
एका जंगलात एक जबरदस्त, डौलदार सर्वात मोठा, धाडसी, जंगलाचे रक्षण करणारा, सर्वांना सांभाळून घेणारा असा भला मोठा हत्ती होता. इतर ही हत्ती होते पण याची शान वेगळीच होती. अनेक तरस, कोल्हे, लांडगे, गिधाड, गोचीड यावर डोळे लाऊन होते, की कधी याला आम्ही खाऊ. तस लांडगे आणि तरस कधी कधी यावर हल्ला करायचे आणि लचके तोडायचे. पण हा सक्षम होता त्यामुळे पुन्हा धडधाकट होऊन उभा राहायचा आणि इतर सर्व प्राणी आणि पक्षी यांचं रक्षण करायचे. कोल्हा मात्र याच्यापासून दूर असायचा. हळू हळू कोल्हा या हत्तीचा मित्र झाला. तरस आणि लांडगे यांची चाहूल लागली की तो हत्तीला सावध करायचा. या मुळे हत्तीला आणि इतर प्राण्यांना कोल्हावर प्रचंड विश्वास बसला आणि त्यांनी कोल्हांच्या हातात हत्तीच्या रक्षणाची जबाबदारी दिली. जंगलाचा हा भाग कोल्हा सांभाळू लागला आणि पूर्ण जंगलाचा राजा सिंह ही निश्चिंत झाला. आता कोल्हा हत्तीच्या गंडस्थळावर बसू लागला. इकडे लांडगे आणि तरस यांची ससेहोलपट होऊ लागली. त्यांनी संधी बघून कोल्ह्याला जाळ्यात ओढलं  आणि त्याच्याशी संधान बसवलं. कोल्हा पण आपली जबाबदारी विसरला आणि त्यांच्यासोबत संधान बांधले. इतर प्राण्यांना हे आवडले नाही पण त्यांना वाटले जंगलात शांती नांदते मग असूद्यात.  नेमकी ही संधी साधून लांडगे आणि तरसनी कोल्ह्याला हत्तीच्या गंडस्थळावर वार करायला सांगितला आणि त्यातून भळभळ वाहणारे रक्त हे रक्तपिसासू पिऊ लागले. आता हत्ती हतबल होता. तेव्हा असाच एक युवा शेरछावा या रक्तपिसासू तरसना अडवा येतो तर ते तरस त्याचे लचके तोडून हाल हाल करून मारतात. हे सर्व वर बसलेला कोल्ह्याला दिसत असते. पण, तो पण हत्ती आपल्या कंट्रोल मधे आहे या जोशात मूग गिळून गप्प बसतो. आणि फक्त त्या नराधम तरसला काही दिवस रक्त पिण्यास मनाई करतो. 
त्या शेर छावाचा अंत बघून ते जंगल हळहळत. कोल्हा फक्त कारवाई केली असा आव आणतो आणि सर्वांचे लक्ष दुसरीकडे वळावे म्हणून कावळ्यांना जास्त आवाजात ओरडू नका अशी तंबी द्यायला सुरवात करतो. पण जितका त्रास त्या कावळ्यांच्या आवाजाचा आहे त्यापेक्षा या तरसाची वृत्तीं असलेल्या नराधमांचा आहे.
शेवटी जंगलच्या राजाने यात लक्ष घालावे हीच विनंती. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)