संतोष देशमुख अमर रहे
कै. संतोष देशमुख अमर रहे...
"माझे हातपाय तोडा पण माझ्या मुलीसाठी आणि मुलासाठी मला जिवंत ठेवा."
खरतर राजकीय विषयावर लिहायचे नाही असा प्रण करून आता 3 वर्ष झालीत आणि बऱ्यापैकी तो पाळला देखील.. पण गेले 1 महिनाभर संतोष देशमुख यांचा हत्याकांडचा विषय चालू आहे. आणि त्यात जी आता माहिती समोर आली आहे की किती क्रूर पणे त्यांची हत्या केली आहे ते ऐकून आणि वाचून मन सुन्न झाले आहे. आतून अस गदगदून येत आहे. रोज रात्री झोपताना संतोषदादा किती व्याकुळतेने आपल्या जीवाची भीक मागत असतील हे डोळ्यासमोर येत आहे आणि अस्वस्थ होत आहे. आणि का तर स्वतःसाठी नाही तर आपल्या जीवापालीकडे जपलेल्या मुलीसाठी आणि मुलासाठी.
सरपंच म्हणून आपले कर्तव्य पार पाडत होते, गावकरी म्हणून त्या आपल्या वाचमनला वाचवत होते, गावच्या हद्दीत कंपनी सुरू होत होती त्याने गावचा विकास होत होता, गावात रोजगार येत होता. पण या गिधाडांना लचके तोडायला भेटले नाही म्हणून सरळ सरळ एका वाघावर झडप घातली. या हरामखोरांना खायला भेटावे म्हणून एक कर्तृत्ववान सरपंच, एक बाप, एक कुटुंबाचा प्रमुख यांनी हिरावून टाकला. मारताना इतके निर्दयी झाले की यांना जन्म देणाऱ्या आईला सुद्धा लाज वाटत असेल. शासन ने यांना सुद्धा वेगळी शिक्षा द्यावी.
जो हरामखोर मुतला आहे त्याची ती जागा शिवून टाका. ज्याने पाईप मारले त्याच्या मागे पाईप घालून मागे झाकण लाऊन बंद करा. आणि द्या या सा..ना खायला प्याला. तुमची भूक लय मोठी आहे म्हणून एक निष्पाप जीव इतक्या क्रूरपणे घेतलात ना. मग खा आणि प्या आणि जिथून खाल तिथूनच बाहेर काढा. हे लगेच मेले नाही पाहिजेत.. यांचे क्रूर कर्म यांना अनुभवद्यात आणि मरणाची भीक मागूद्यात.
संतोष दादा आम्हाला माफ करा.. इतके दिवस झाले तरी हे षंढ शा.. न तुमचे खरे मारेकरी पकडू शकले नाही.
Comments
Post a Comment