लोकशाहीचे सण - निवडणुका

          लोकशाहीचे सण - निवडणुका
लोकशाही ही संस्कृती मानली तर निवडणुका ह्या या संस्कृतीचे सण आहेत.  लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषद, नगरपरिषद, पंचायत समिती, सरपंच, महानगरपालिका, पोटनिवडणुका अशा अनेक निवडणुका त्या त्या प्रकारे साजऱ्या केल्या जातात. 
लोकसभा, विधानसभा ह्या मोठ्या लोकसंखेच्या असतात त्यामुळे तिथे सामान्य जनतेचे कमी सहभाग असतात. नेते, पदाधिकारी अशा निवडणुका सांभाळून थोडेफार कार्यकर्ते यात सहभागी असतात. 
 पंचायत, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्या निवडणुका खऱ्या अर्थाने जनतेच्या असतात. इथे उमेदवार हा स्थानिक, आपल्या आजूबाजूचा, ओळखीचा, नात्यात, मित्र, शेजारी असा असतो. विरोधक पण कसे ना कसे ओळखीचे असतात. इथे खरा निवडणुकीचा सण जमिनीवर साजरा होतो.  मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा महाराष्ट्रातील महानगरांच्या महानगरपालिका निवडणुका 2015 सालात झाल्या होत्या. 2020 मध्ये कोरोना आला आणि निवडणुका रद्द झाल्या त्या झाल्याच. त्यामुळे अनेक नवीन कार्यकर्त्यांची नगरसेवक व्हायची स्वप्ने पुढे ढकलली गेलीत. 2023 पासून निवडणुका लागतील अशी आस लाऊन बसलेले उमेदवार, कार्यकर्ते. पण काही जनतेला वाटत होते जर कारभार असा सरकारी अधिकारी चालवत असतील तर कशाला हव्यात निवडणुका आणि त्यांच्यावर खर्च. पण आपण लोकशाहीत राहतो आणि जसे मी म्हटले निवडणुका ह्या लोकशाहीचे सण असतात आणि ते साजरे झालेच पाहिजेत.  यात सामान्य जनतेला राजकारणात उतरण्याची संधी भेटते.  शहरातील जनता, कार्यकर्ते या निमित्ताने प्रचाराची एक नवीन लाट अनुभवतात. प्रभागाचा, शहराचा झालेला विकास आणि भ्रष्ट्राचार, ya निमित्ताने सर्वांना समजतो. नवीन आश्वासने भेटतात. काही निवडून येऊन गायब झालेले नगरसेवक पुन्हा मतदारांना साद घालायला दोन्ही हात जोडून येतात. ज्यांनी काम केलेलं असत त्यांच्यासाठी जनताच मैदानात उतरते. नवीन उमेदवार आपला जोर दाखवतात आणि सीट खेचून आणतात. तर अशा या बहुप्रतीक्षेत असलेल्या निवडणुका 15 जानेवारी 2026 रोजी लागल्या आहेत. 3 जानेवारीला शेवटची उमेदवारी यादी जाहीर झाली आणि प्रचाराचे नारळ फुटले. सर्वांनी चाचपणी करत करत मैदानात तळ ठोकायला सुरवात केली आहे. आज लेख लिहताना दिनांक आहे रविवार 11 जानेवारी. हा शेवटचा आणि महत्वाचा रविवार आहे. आज सर्व उमेदवार आपला पूर्ण दमखम दाखवणार आणि उद्यापासून आतून छुपा प्रचार सुरू होणार. यात अनेकजण मालामाल होतील, अनेकजण इकडून तिकडे उड्या मारून जमतील इतक्या नोटा जमवण्याचा प्रयत्न करतील. असो..
यावेळी निवडणूक आयोगाने पॅनल पद्धत आणली आहे. यात चार प्रभाग मिळून एक वॉर्ड तयार केला आहे. प्रत्येक मतदाराने 4 वेळा मतदान करायचे आहे. आणि चार उमेदवार निवडून आणू शकता. यामुळे उमेदवारांना खूप जास्त मेहनत घ्यावी लागत आहे. एवढ्या मोठा वॉर्ड मध्ये प्रचार करायचा. सोबत आपल्या तीन सहकाऱ्यांसोबत टीम वर्क करायचे असे जिकिरीचे काम आहे. हा तर झाला बाह्यखेळं. या निवडणुकांमध्ये जो आतून पैशांचा खेळ चालतो तो समजण्यापलकडील असतो. आणि तो गरजेचा पण आहे.. आपली व्यवस्था अशी आहे की. तुम्ही पण खा आम्ही पण खातो.. आम्ही पाच वर्ष खाऊ. तुम्ही निवडणुकीत खा..काही जण खरंच निस्वार्थीपने जनतेची काम करत असतात. समाजसेवा करत असतात पण त्याचा टक्का खूप कमी आहे. असो..
तर आता या सणात सर्वात जास्त मजेशीर असते ते प्रचार यात्रा, घोषणा, बॅनर्स, कार्यकर्त्यांचा उत्साह, पार्ट्या, रॅली आणि बरच काही.. 
सध्या सर्व महानगर 10 वर्षांनंतर हा निवडणुकीचा सण साजरा करत आहेत आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह भरला आहे.. अस वाटत हे असच सुरू रहाव.. पण ते शक्य नसत. म्हणून आता हा सण एन्जॉय करून घ्या.. 
जय हिंद जय महाराष्ट्र 
जयंत जगताप.. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)