नगरसेवकांसाठी काही नवीन उपक्रम
नगरसेवकासाठी काही वेगळे आणि नवीन उपक्रम
आता महानगरपालिका निवडणुका लागल्या आहेत.
सर्वच उमेदवार बेसिक घेऊन प्रचार करत आहेत पण
रस्ते, खड्डे, वीज, पाणी, टॉयलेट लाईन खराब होत राहतात आणि त्या बदलत राहणे हे बेसिक काम आहे. यासाठी निधी आणणे आणि ती करून घेणे हे पालिकेचे काम असते आणि त्यासाठी सामान्य जनता कर भरत असते.
आपला नगरसेवक या व्यतिरिक्त खालील उपक्रम राबवून आपल्या प्रभागात खऱ्या अर्थाने विकास साधून आपला वेगळा ठसा उमटवू शकतात.
1. विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला आयोजित करणे.
2. प्रतिवर्षी MPSC, UPSC मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे.
3. दरवर्षी विविध खेळ स्पर्धा आयोजित करणे. (बॅडमिंटन, कब्बडी,)
4. विभागातील हॉस्पिटल मध्ये आयुष्यमान आणि महात्मा जोतिबा फुले योजना सुरू करून घेणे.
5. दरवर्षी महाराष्ट्रातील एक देवस्थान दर्शन सहल काढणे. (जेष्ठ नागरिक) फक्त घरमालक.
जयंत जगताप
Comments
Post a Comment