अफवांमधून तयार झालेले वलय
अफवांमधून तयार झालेले वलय
अजून पर्यंत अजित दादा अनेकांना वैयक्तिक आवडले नव्हते
त्याचं नाव आलं की समोर 70 हजार करोड आणि धरणात मूतन एवढच समोर येत होत..
पण ते असे अचानक गेले हे ऐकल्यावर मनात एक चर्र होऊन जात तस वाटलं
दादा गेल्यावर लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणि लोकांनी ओक्साबोक्सी होऊन फोडलेला हंबरडा पाहून मन व्याकुळ झाल..
वाटलं लाखाचा माणूस गेला
हे सर्व आता realize होतंय माणूस किती कामाचा होता
यातून मनात विचार आला.. अजित दादा खरे होते काय आणि त्यांना न ओळखणाऱ्या फक्त एखाद्या भेटीतून किंवा ऐकीव माहितीवरून लोकांनी त्यांची एक निगेटिव्ह इमेज तयार केली होती.
दादा तोंडावर जे काय असेल ते बोलायचे. काम होत असेल तर हो नाहीतर नाही. यातून काहीजण दुखवत असणार आणि अशी माणसं मग स्वतःच्या मनाने अजित दादा लय उद्धट, लोकांची त्यांना कदर नाही, समाजात, राजकारणात कसे वागावे हे त्यांना कळत नाही अशा अफवा उठवत बसणार.
समाजात सुद्धा काही स्वार्थी, समाजकंटक, दुसऱ्याला नावे ठेवली की आपण श्रेष्ठ होतो असा गैरसमजात रहाणारी वृत्तीची माणसे असतात. ज्यांनी एखाद्या व्यक्तीसोबत कधी काम केलेले नसते, त्यांना जवळून ओळखत नसतात अशा लोकांबद्दल तिसऱ्या व्यक्तीकडे त्यांची निंदा नालस्ती करतात, ती व्यक्ती कशी समाजात कामाचा नाही, किंवा ती खुप तापट आहे, अगदी त्याला वेडे ठरवून हे लोक मोकळे होतात आणि एक राक्षसी आनंद अनुभवतात.
पण खर तर या असल्या मागे केल्या जाणाऱ्या निंदानालस्तीमुळे नाहीतर दादा विचलित झाले, आणि नाही समाजात निःस्वार्थ काम करणारी माणसे विचलित होणार. ती आपल सामाजिक, राजकीय कार्य जसे आहे तसं सुरूच ठेवतात. त्यांना त्या लोकांचा काही फरक पडत नाही जी कोणतीही माहिती न घेता त्या व्यक्तीबद्दल मत बनवतात आणि दूर राहतात.
त्यामुळे अफवांवर विश्वास नका ठेऊ. स्वतः अनुभव घेऊन मत बनवा अन्यथा तटस्थ रहा..
धन्यवाद
जयंत जगताप
Comments
Post a Comment